71st National Film Awards 2025 Winners : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा १ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. आज ( २३ सप्टेंबर ) या सर्व विजेत्यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

कलाकार व तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. भारतात १९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली होती. यंदा शाहरुख खानला तब्बल ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रांत मॅसी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात आला आहे. तर, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. यासह यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे.

Live Updates

71st National Film Awards Ceremony Updates –

16:45 (IST) 23 Sep 2025

सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट

सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपटाचा पुरस्कार Godday Godday Chaa या सिनेमाला प्रदान करण्यात आला आहे.

16:42 (IST) 23 Sep 2025

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: द फर्स्ट फिल्म (हिंदी)

द फर्स्ट फिल्म- दिग्दर्शक पियुष राठोड

16:39 (IST) 23 Sep 2025

सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन

सचिन सुधाकरन आणि हरिहरन मुरलीधरन – Animal

16:38 (IST) 23 Sep 2025

71st National Film Awards : सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म

‘द फ्लॉवरिंग मॅन’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

16:28 (IST) 23 Sep 2025

16:18 (IST) 23 Sep 2025

शाहरुख खान व राणी मुखर्जी

16:16 (IST) 23 Sep 2025

71st National Film Awards Updates : पुरस्कार सोहळ्याला सुरुवात…

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन नॅशनलच्या यूट्यूब चॅनलवर करण्यात आलं आहे.

16:10 (IST) 23 Sep 2025
71st National Film Awards : पुरस्कार सोहळ्याला पोहोचले शाहरुख खान व राणी मुखर्जी, पाहा फोटो….

71st National Film Awards Full List Of Winners : ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये शाहरुख खान व राणी मुखर्जी यांचा सन्मान