Entertainment News Today: पोलीस अधिकारी सेलिब्रिटींच्या घरी आले की नेमकं काय घडलं? याबद्दल चर्चा सुरू होते. दोन दिवसांपूर्वी आमिर खानच्या घराबाहेर पोलिसांची एक बस दिसली होती. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या बसमध्ये २५ आयपीएस अधिकारी होते. अचानक आमिरच्या घराबाहेर पोलिसांची बस दिसल्याने चर्चा रंगल्या होत्या. आता आमिरच्या टीमने यामागचं कारण सांगितलं आहे.
हे २५ जण प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी होते आणि ते आमिर खानला भेटण्यासाठीच त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी आले होते. “सध्याच्या बॅचच्या आयपीएस प्रशिक्षणार्थींनी आमिर खानला भेटण्याची विनंती केली होती. त्यामुळे आमिर खानने घरी त्यांचे आदरातिथ्य केले,” असे वृत्त न्यूज18 आमिरच्या टीमच्या हवाल्याने दिले आहे.
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
“तुम्ही १० कोटी डॉलर्स दिले तरी गाणार नाही, कारण…”; लता मंगेशकर यांनी जेव्हा लग्नात जाण्यास दिलेला नकार
आमिर खान (फोटो – सोशल मीडिया)
आमिर खानच्या घरी आयपीएस अधिकारी आले होते, त्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या. आता या अधिकाऱ्यांनी अभिनेत्याच्या घरी भेट का दिली त्याचं कारण समोर आलंय.