actress neena gupta shared her new workout video netzines appreciate her spg 93 | नीना गुप्तांचा वर्कआउट बघून व्हाल थक्क, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, "ही तर सुरवात..." | Loksatta

नीना गुप्तांचा वर्कआउट बघून व्हाल थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “ही तर सुरवात…”

बॉलिवूडमधील कलाकार आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात

नीना गुप्तांचा वर्कआउट बघून व्हाल थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “ही तर सुरवात…”
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अभिनेत्री नीना गुप्ता यांची चित्रपटातील सेकंड इनिंग ही जोरदार सुरू आहे. ‘बधाई हो’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर नीना गुप्ता या बऱ्याच चित्रपटात झळकल्या. त्यांच्या अभिनयाचीसुद्धा चांगलीच प्रशंसा झाली. नीना गुप्ता यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या. नुकतंच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘उंचाई’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली.

नीना गुप्ता अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. आज या वयात ही त्यांची ऊर्जा एखाद्या तरुणीला लाजवेल अशी आहे. नुकताच त्यांचा वर्कआउटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्या पुशअप्स हा वर्कआउटचा प्रकार करत आहेत. प्रशिक्षकाची मदत घेत त्या व्यायाम करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवर त्यांनी कॅप्शन दिला आहे, “नुकतीच सुरवात केली आहे म्हणून शो ऑफ करत आहे.”

नीना गुप्ता यांच्या वर्कआउट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली असून त्यांचे कौतूक करत आहेत. वाह, कमाल, टाळी वाजवणारे इमोजीस अशा भरभरून कमेंट्स नेटकरी करत आहेत. आजकाल सगळेच कलाकार आपल्या फिटनेसच्या बाबतीत जागरूक झाले आहेत,

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 19:48 IST
Next Story
बहुचर्चित ‘अवतार २’ केरळमध्ये होणार नाही रिलीज; चित्रपटगृहाच्या मालकांचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण