तीन दशकांच्या बॉलिवूड कारकिर्दीत अक्षय कुमारने अनेक चढउतार पाहिले आहेत. खिलाडी कुमारने त्याच्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, तर अनेकदा त्याला अपयशही आले. अलिकडचे उदाहरण घ्यायचे तर, ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षा बंधन’ या चित्रपटांच्या फ्लॉप शोमुळे अक्षय कुमार सातत्याने ट्रोल होत आहे. पण या सगळ्याचा अक्षय कुमारच्या मानधनावर काहीच परिणाम झालेला नाही, कारण अक्षय कुमार अजूनही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षय अलीकडेच ‘कठपुतली’मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. रणजीत एम. तिवारी दिग्दर्शित, २०१८मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट ‘राक्षसन’च्या या हिंदी रिमेकमध्ये रकुल प्रीत सिंग आणि सरगुन मेहता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २ सप्टेंबर रोजी थेट डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि IMDb रेटिंगनुसार अक्षयचा 2022 मधील हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
आणखी वाचा- बॉयकॉट ट्रेंडबाबत ‘त्या’ वक्तव्यानंतर श्रेयस तळपदेचा आलियाला खास सल्ला, म्हणाला…

ओटीटी रिलीजमुळे लोकांना वाटले की अक्षय कुमारच्या इतर प्रोजेक्टच्या तुलनेत ‘कठपुतली’ चित्रपटाचे बजेट कमी आहे. पण, काही रिपोर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट १५० कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे. इतकंच नाही तर अक्षय कुमारचं ‘कठपुतली’साठीचं मानधन चित्रपटाच्या एकूण बजेटच्या ८० टक्के एवढी असल्याची माहिती रिपोर्ट्समधून समोर आली आहे. खिलाडी कुमारने ‘कठपुतली’साठी १२० कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, या दाव्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

आणखी वाचा- अक्षय कुमार पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, प्रसिद्ध युट्युबरकडून होतोय व्हिडीओ कॉपी केल्याचा आरोप

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झालं तर ‘कठपुतली’ नंतर त्याचा पुढचा चित्रपट ‘राम सेतू’ असणार आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित, अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar charge 120 cr for kathputali film release on ott