बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अक्षय सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता नुकतीच अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अक्षयने त्याची बहिण अल्काला समर्पित केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये अक्षयने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. अक्षय दिग्दर्शक आनंद एल राय यांच्याशी चर्चा करताना दिसतं आहे. हा फोटो शेअर करत “मोठं होतं असताना माझी बहिण, अल्का माझी पहिली मैत्रिण होती. या मैत्रीसाठी कोणती ही वेगळी मेहनत करावी लागली नाही. आनंद एल रायचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट मी तिला समर्पित करतो आणि अशा सगळ्यात महत्वाच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजे चित्रीकरणाचा पहिला दिवस, तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत,” अशा आशयाचे कॅप्शन अक्षयने दिले.

आणखी वाचा : ‘राजू’ सोबत झळकणार ‘श्याम’चा मुलगा, अहना शेट्टी करणार अक्षयसोबत काम!

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

दरम्यान, ‘रक्षाबंधन’ या चित्रपटात अक्षयसोबत भूमि पेडनेकर मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटात अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत सहेजमीन कौर, दीपिका खन्ना, सादिया खतीब, स्मृती श्रीकांत दिसणार आहेत. तर, अक्षय आणि भूमि दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत. या आधी ते दोघे ‘टॉयलेटः एक प्रेम कथा’ या चित्रपटात दिसले होते.