एसएस राजमौली यांच्या सिनेमाची खासियत म्हणजे भव्य सेट, दमदार अ‍ॅक्शन आणि डोळे दिपवणारी दृश्य. यंदाच्या वर्षातील त्यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणजेच ‘आरआरआर’. बाहुबली सिनेमानंतर राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमांची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या वर्षातच हा सिनेमा रिलीज होत असून या सिनेमाच्या सेटवरील मेकिंगचा पहिला व्हिडीओ रिलीज करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेलीय.

सिनेमाच्या मेकिंग व्हिडीओतच या सिनेमाची भव्यता लक्षात येतेय. ‘बाहुबली’ सिनेमाप्रमाणेच आरआरआर’ सिनेमासाठी देखील भव्य सेट तयार करण्यात आल्याचं या व्हिडीओत दिसतंय. राजमौली यांसोबतच सिनेमातील इतर अनेक कलाकारांनीदेखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय .रिलीज होताच या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या आलिया भट, राम चरण, ज्यूनिअर एटीआर, अजय देवगण या कलाकारासह श्रिया सरन आणि इतर कलाकांचीदेखील झलक पाहायला मिळतेय. शिवाय सिनेमाच्या सेटवरी अ‍ॅक्शन सीनसाठी केली जाणारी तयारी आणि अ‍ॅक्शन सीन रोमांच उभे करणारे आहेत

हे देखील वाचा: “बिग बी आपला मोठेपणा दाखवा”, अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर मनसेचे पोस्टर

राजमौली यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या मेकिंगचा व्हिडीओ त्यांनी स्वत: ट्विटरवर शेअर केला आहे. “आरआरआर सिनेमाच्या मेकिंगची झलक. आशा करतो व्हिडीओ तुमच्या पसंतीस पडेल.”

RRR हा सिनेमा स्वातंत्र्य सैनिक कोमाराम भीम आणि अल्लूरी सीताराम राजू यांच्या जीवनावरील काल्पनिक कथेवर आधारित आहे. मेकिंगच्या व्हिडीओत दाखवल्यानुसार हा सिनेमा १३ ऑक्टोबर २०२१ ला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं बजेट जवळपास ४५० कोटी रुपये असल्याच्या चर्चा आहेत.