आज फ्रेण्डशीप डेच्या निमित्ताने बॉलिवूड कलाकारांसोबतच अनेकांनी आपल्या मित्र मैत्रिणींसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेकांनी जुने फोटो शेअर करत मैत्रीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने देखील बालपणीचा मैत्रिणीसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत आयरा आणि तिची बेस्ट फ्रेण्ड डॅनियल परेरा दोघीही खूप गोड दिसत आहेत.
आयरा शेअर केलेल्या फोटोत तिच्या तिने निळ्या रंगाचं एक टीशर्ट परिधान केलंय. गळ्यात गुलाबी मण्यांची माळ पाहायला मिळतेय. तर आयराच्या बॉयकटमुळे तिला ओळखणं कठीण होतंय. फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली, “तुम्ही या कूल मुलांना भेटला आहात का?”
हे देखील वाचा: Friendship Day Special: कोण आहेत मराठी कलाकारांचे खास दोस्त?
आयाराने शेअर केलेल्या तिच्या या बालपणीच्या फोटोला अनेकांनी पसंती दिली आहे. तर अनेक नेटकऱी आयरा या फोतच आमिर खान सारखीच दिसत असल्याचं म्हणाले आहेत. एक नेटकरी आयलाराचा हा फोटो पाहून म्हणाला “छोटा आमिर” तर आयराचे कान पाहून एक नेटकरी म्हणाला, “तुझे कान तुझ्या वडिलांसारखेच आहे.” दुसरा म्हणाला, “तू अगदी तुझ्या व़डिलांसारखीच दिसतेस.”
आयरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे आयरा चांगलीच चर्चेत आली होती. आयराने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या शेजारी असलेल्या बॉक्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं हा बॉक्स पाहून “तू धुम्रपान करतेस का?” असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला होता.
