अभिनेते अमिताभ बच्चन यांना घराघरात पोहोचवणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती. ‘सोनी वाहिनी’वर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आजही प्रेक्षक उत्सुक असतात. घरोघरी हा कार्यक्रम नित्यनेमाने पाहिला जातो. या कार्यक्रमाचं स्वरूप तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना प्रश्न तर विचारतातच पण हा खेळ खेळताना ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत काही किस्सेसुद्धा सांगत असतात. असाच एक प्रसंग नुकताच घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : दिग्दर्शक मधुर भांडारकरने घेतले अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत लालबागच्या राजाचे दर्शन

‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या भागात सौरभ शेखर नावाचे स्पर्धक हॉटसीटवर बसले होते. वापीचे असलेले सौरभ एका टेक्स्टाईल कंपनीत काम करतात. कार्यक्रमादरम्यान अमिताभ यांच्याशी बोलताना सौरभ यांनी त्यांवह्या लाहानपणीच्या काही रंजक घटना सांगितल्या. ‘एकदा क्रिकेट सामना पाहण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना फटकावले,’ असा खुलासा त्यांनी केला.

यावर अमिताभ यांनीही त्यांच्या लहानपणीचा घडलेला एक प्रसंग शेअर केला. अमिताभ बच्चन यांनाही सारख्याच प्रसंगाला समोरे जावे लागले होते असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “एकदा मी पांघरूणाखाली जाऊन रेडिओवर क्रिकेटचा सामना ऐकण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते करत असताना मला आईने मला पकडले. माझे वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. माझ्या आईने माझे ब्लँकेट काढले आणि मला बेदम चोप दिला.”

हेही वाचा : अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

अमिताभ बच्चन यांना मध्यंतरी करोना झाला होता. त्यातून बरे होऊन त्यांनी केबीसीचं चित्रीकरण पुन्हा सुरू केलं आहे. अमिताभ बच्चन लवकरच प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. शिवाय सुरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटासाठीसुद्धा बिग बी तयारी करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan shared childhood memory that his mother beaten him rnv