Amitabh Bachchan Twitter Blue Tick: एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये बरेच बदल केले जात असल्याचं दिसत आहे. आता गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायला ट्विटरने सुरुवात केली आहे. यनुसार, जगभरातील अनेक दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, अभिनेते, खेळाडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लु टिक हटवण्यात आली आहे. भारतात सुद्धा नेतेमंडळींसह, शाहरुखखान , विराट कोहली, सलमान खान, अमिताभ बच्चन यांच्या नावापुढील ब्लु टीका हटवण्यात आली आहे. यानंतर आता अमिताभ यांनी ट्विटर भईया असे म्हणत एक खास ट्वीट केले आहे. अस्सल इलाहबादी भाषेत अमिताभ यांनी केलेले ट्वीट वाचून नेटकरीही खूप हसले आहेत. तर काहींनी अमिताभ यांचीच कमेंट बॉक्समध्ये फिरकी घ्यायला सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरकडे केली मागणी

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट मध्ये लिहिले की, “ट्विटर दादा, ऐकतोय का, आम्ही आता पैसे पण दिले आहेत तर आता ते जे निळं कमळ लावतात नावाच्या पुढे तो पुन्हा लावून द्या की, म्हणजे निदान लोकांना कळूदे की मीच अमिताभ बच्चन आहे, हात तर जोडलेत आता काय पाया पडू का? “

दरम्यान, अमिताभ यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत. अरे तुम्ही कोण आहात तुम्ही आमच्या बिग बींची कॉपी करू नका असे म्हणत काहींनी बच्चन यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे फोटो खाली ट्वीट केले आहेत.

हे ही वाचा<< विना भांड्याचे बेसिन, नळ करतो जादू! किम कार्दशियनच्या ६० मिलियनच्या घरातील Video पाहून म्हणाल, “पैसा है बॉस”

एलॉन मस्कनं २० एप्रिलपासून सर्व लेगसी अकाऊंटचे ब्लू टिक काढले जातील असं जाहीर केलं होतं. पैसे मोजून ब्लू टिक घेणाऱ्यांनाच आता या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीच या सर्व अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आली. आता वेबसाईटवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी ८ डॉलर प्रतिमहिना तर मोबाईल अॅपवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी ११ डॉलर प्रतिमहिना असे दर आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan tweet calling out elon musk twitter bhaiya after blue tick removed fans confused says original big b svs