'अमृता खानविलकरकडून काय शिकलास?' पती हिमांशू मल्होत्रा म्हणाला "त्याउलट कृती..." | Amruta Khanvilkar husband Himanshu Malhotra reveled what he learn from wife nrp 97 | Loksatta

‘अमृता खानविलकरकडून काय शिकलास?’ पती हिमांशू मल्होत्रा म्हणाला “त्याउलट कृती…”

हिमांशूने अमृताचा एक फोटो शेअर केला आहे.

‘अमृता खानविलकरकडून काय शिकलास?’ पती हिमांशू मल्होत्रा म्हणाला “त्याउलट कृती…”
अमृता खानविलकर हिमांशू मल्होत्रा

मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची बॉलिवूडमध्येही चर्चा असते. सध्या अमृता ही झलक दिखला जा असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हा कायमच तिच्याबद्दल विविध गोष्टींचा खुलासा करत असतो.

अमृता खानविलकरचा पती अभिनेता हिमांशू मल्होत्रा हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. हिमांशूने नुकतंच इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने तो पत्नीकडून काय शिकला याबद्दल सांगितले आहे. हिमांशूने अमृताचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने त्यावर हिंदीत त्याने अमृताकडून कोणती शिकवण घेतली याबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “यामागे काही…” आस्ताद काळेने सांगितले उजव्या दंडावर छत्रपती शिवरायांचा टॅटू काढण्यामागचे खरे कारण

याबद्दल बोलताना हिमांशू म्हणाला, “आपण विचार कमी करायला हवा. त्याउलट कृती करण्याला जास्त प्राधान्य द्यायला हवे. जर आपण विचार करत राहिलो तर विचारच करत राहतो. ही गोष्ट मी माझ्या पत्नीकडून शिकलो आहे. जो व्यक्ती त्याचा वेळ विचार करण्यात घालवतो, तो खूप कमी जीवन जगतो. त्याबरोबरीनेच तो त्याचे कर्म आणि त्यापासून मिळणाऱ्या कर्माच्या फळांपासूनही तो दूर राहतो.”

आणखी वाचा : “जबरदस्ती गर्भपात, शारीरिक छळ आणि पट्ट्याने मारहाण…” ‘बिग बॉस’मधल्या ‘गोल्डमॅन’ विरोधात पत्नीने केलेले गंभीर आरोप

अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले. तर या दोघांची पहिली भेट ही २००४ साली झाली होती. नेहमीच अमृता आणि हिमांशू त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. हिमांशू हा कायमच अमृताला पाठिंबा देताना दिसतो. तो तिच्या अनेक चित्रपटांबद्दल पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतो.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:58 IST
Next Story
२१व्या वर्षी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा करणाऱ्या मुलीची गोष्ट मोठ्या पडद्यावर; मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री