बॉलिवूडची फॅशनीस्टा म्हटलं की अभिनेत्री सोनम कपूरचे नाव समोर येतं. सोनम कपूर सोशल मीडियावर तिच्या सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. सध्या तिच्या  लंडनमधील घरातले फोटो इन्स्टावर व्हायरल झाले आहेत. अनेक जण हे फोटो पाहुन कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया मांडताना दिसत आहेत. मात्र तिच्या पती आनंद आहुजाच्या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोनम कपूरने Architectural Digest या मासिकासाठी घराचे फोटोशूट केले आहे. यात सोनमच्या घरातील फर्निचर,  कॉफी टेबल यासह विविध वस्तू पाहायला मिळत आहेत. सोनमने शेअर केलेल्या एका फोटोत ती लाल रंगाच्या सोफ्यावर आराम करताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटो ती निळ्या रंगाच्या सोफ्यावर चक्क बूट घालून उभी राहिली आहे ज्या सोफ्याची किंमत १८ लाख रुपये आहे. यात तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस आणि काळ्या रंगाचे बूट परिधान केल्याचे दिसून येत आहे. नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये तिच्या घराचे आणि फर्निचरचे कौतुक करताना दिसत आहेत.  तर तिचा पती आनंदने यावर प्रतिक्रिया देतं लिहिले, “आता मी जेव्हा ही या सोफ्यावर बसेन तेव्हा माझ्या समोर हेच चित्र येईल”. त्याच्या या कमेंटला हसत उत्तर देत सोनम म्हणते, “आनंद, मी नवीन सोफ्यावर उभी राहिली म्हणून मला माफ कर.”

मंगळवारी सोनमने तिच्या लंडनच्या घरातील फोटो शेअर करत मोठे कॅप्शन दिले. यात तिने तिच्या घरासोबतच अनेक गोष्टींबद्दलची माहिती दिली आहे. तसंच सोनम आणि आनंदला त्या फ्लॅटमध्ये शिरताच घरात आल्या सारखे वाटले असे ही तिने त्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सोनमच्या कामाबद्दल बोलायचे झाले ते ती लवकरच ‘ब्लाइंड’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसेल.