बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच अनन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे अनन्या सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच करण जोहरचा मित्र अपूर्व मेहताचा ५० वा वाढदिवस होता. तर त्याच्या बर्थडे पार्टीला अनन्या पांडेने स्टायलीश लूकमध्ये हजेरी लावली होती. तर अनन्याचा पार्टीतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हमप्लाने शेअर केला आहे. यात अनन्याने काळ्यारंगाचा ट्रान्सपरंट असा ड्रेस परिधान केला आहे. काही नेटकऱ्यांना अनन्याचा हा लूक आवडला आहे तर काही नेटकऱ्यांना आवडला नाही.

आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video

आणखी वाचा : “आम्हाला आता माहित झालं…”, अमिताभ यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर केली Cryptic पोस्ट?

अनन्याला ट्रोल करत एक नेटकऱ्या, अतरंगी फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्फीशी अनन्याची तुलना केली आहे. तर दुसरा नेटकरी म्हणाला, कोण आहे ही उर्फीचं भूत आलं का हिच्या अंगात. दरम्यान अनन्याने २०१९ मध्ये स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अनन्या कार्तिक आर्यनसोबत ‘पति पत्नी और वो’ चित्रपटात दिसली. ‘खाली-पीली’ या चित्रपटात ईशान खट्टरसोबत दिसली. लवकरच विजय देवरकोंडासोबतअनन्या ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya panday stylish gown is talk of the town fans comparison with urfi javed dcp