Arjun Kapoor’s Birthday Wish for Ex-Girlfriend Malaika Arora : बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दोघेही आधी बॉलीवूडमधील पॉवरफुल कपलपैकी एक होते. त्यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. परंतु, आता त्यांचे ब्रेकअप झाले असले तरी ते एकमेकांसाठी चांगले मित्र आहेत हे स्पष्टपणे दिसून आले आहे.
ब्रेकअपनंतरही अर्जुन कठीण काळात मलायकाच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि जेव्हा जेव्हा ते भेटतात तेव्हा तेव्हा ते एकमेकांबरोबर आनंदी असतात. आज मलायकाच्या वाढदिवशी अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. आज मलायका अरोरा तिचा ५२ वा वाढदिवस साजरा करीत आहे.
अर्जुनने मलायकाचा फोटो केला शेअर
इन्स्टाग्रामवर मलायकाचा फोटो शेअर करीत अर्जुनने लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा मलायका. उडत राहा, हसत राहा आणि नेहमी एक्सप्लोर करीत राहा.” त्याने मलायकाचा पॅरिस दौऱ्यादरम्यान पोज देतानाचा एक जुना फोटो शेअर केला. चाहतेदेखील तिला शुभेच्छा देत आहेत.
जूनमध्ये मलायका अरोराने अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये अर्जुनचा मस्ती करतानाचा व्हिडीओ होता आणि त्याला, ‘हॅपी बर्थडे अर्जुन’, अशी कॅप्शन दिली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
मलायकाने तिच्या डान्स आणि स्टाईलने बॉलीवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने कधीही तिचे करिअर फक्त चित्रपटांपुरते मर्यादित ठेवले नाही. तिच्या डान्स आणि ऑन-स्टेज परफॉर्मन्समुळे तिला केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवून दिली आहे. मलायका पूर्वी अभिनेता व निर्माता अरबाज खानची पत्नी होती. दोघांनी १९९८ मध्ये लग्न केले आणि त्यांना अरहान खान, असे नाव असलेला एक मुलगा आहे. २०१६ मध्ये ते वेगळे झाले; परंतु मलायकाने तिच्या व्यावसायिक आयुष्यात कधीही तिची चमक गमावली नाही. अरबाजनंतर मलायका अनेक वर्षे अर्जुन कपूरला डेट करीत राहिली.
अलीकडेच मलायका ‘थामा’ चित्रपटातील एका गाण्यात दिसली आणि तिच्या डान्सला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या गाण्यात मलायकाबरोबर रश्मिका मंदानादेखील आहे.
