बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने नुकताच आपला बर्थ डे साजरा केलाय. त्याच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये अनेक सेलिब्रिटीज सामील झाले होते. तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या फॅन्सच्या कमेंट्सचा वर्षाव सुरूच होता. सगळ्यांकडून मिळत असलेलं इतकं प्रेम पाहून अभिनेता अर्जुन कपूर भावूक झाला. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याने त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर केल्या. त्याच्या या इमोशनल पोस्टमध्ये त्याने गर्लफ्रेंड मलायकाचा देखील उल्लेख केला.
अभिनेता अर्जुन कपूनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही इमोशनल पोस्ट लिहिलीय. यात त्याने लिहिलंय, “बर्थ डे सेलिब्रेशन दरम्यान एक विचार मनात आला. एका वर्षात किती काय काय बदल होतो, एक वर्षापूर्वी मी पूर्णपणे निराश-हताश, थकलेला आणि भ्रमित होतो, पण आज मी नवी उर्जा, दृढ संकल्प मनात ठेवून कोणत्याही अडचणीचा सामना करण्यासाठी तयार आहे. आज मला त्या सर्व जणांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी कायम माझ्यावर विश्वास ठेवला आणि कायम माझ्या अडचणीच्या प्रसंगी माझी साथ दिली. माझी काळजी घेतली.”
“मलायका माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा हिस्सा आहे”
या पोस्टमध्ये अर्जुनने मलायकाचा देखील उल्लेख केला. यात त्याने लिहिलं, “माझा हा फोटो मलायका अरोराने क्लिक केलाय…ती माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा हिस्सा आहे आणि तिच्यामुळे माझं आयुष्य आणखी सुंदर बनलंय.” अर्जुनच्या या पोस्टवर त्याचे फॅन्स कमेंट्स करताना दिसून येत आहेत.
अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड मलायकाने दोघांच्या रिलेशनशीपला ऑफिशिअल केलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी एकमेकांचं नाव घेताना टाळणारे हे कपल आता एकमेकांसाठीचं प्रेम खुलेपणाने व्यक्त करताना दिसून येत आहेत. पण तरीही लग्नाबाबत त्या दोघांनीही अजुन काही जाहीर केलेलं नाही.
या चित्रपटात झळकणार अर्जुन कपूर
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच तो ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘सरदार का ग्रॅंडसन’ मध्ये झळकला होता. त्याच्या या दोन्ही चित्रपटाचं खूप कौतुक झालं. याशिवाय तो ‘भूत पुलिस’ आणि ‘एक विलेन 2’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.