बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या प्लॅटिनम ब्लोंड लुकसाठी चर्चेत आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलमधील शूटिंगसाठी हंगरीची राजधामी बुडापेस्टला गेलाय. नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तो त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि त्याचा छोटा मुलगा अरिकसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसून येतोय.
अभिनेता अर्जुन रामपालने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये अर्जुन रामपालने त्याचा मुलगा अरिकला खांद्यावर घेतलेलं दिसून आलं. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो एका पर्यटन स्थळी बसलेला दिसून येतोय आणि बाजुला मुलगा अरिक चालताना दिसून येतोय. तिसऱ्या आणि चौथ्या फोटोमध्ये आरिक त्याच्या आईच्या कमरेवर बसलेला दिसून येतोय. हे फोटोज शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात त्याने लिहिलंय, “कुटुंबासोबत थोडा क्वालिटी टाईम घालवतोय…ते सुद्धा कामावर जाण्या अगोदर.” अर्जुन रामपालने शेअर केलेल्या फोटोजवर चाहते कमेंट्स करत आहेत.
याशिवाय अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने सुद्धा काही फोटोज शेअर केले आहेत. यात तिने मुलगा अरिकला कमरेवर घेतलं आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिलं, “खूप दिवसांनतर आम्ही भेटलो आहोत.”
अर्जुन रामपालने शेअर केलेल्या या फोटोजना आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. फक्त फॅन्सच नव्हे तर बॉलिवूडमधील इतर कलाकार देखील त्याच्या या फोटोवर कमेंट्स करत आहेत. अर्जुन रामपालने यापूर्वी त्याच्या नव्या लूकचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटोज शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “एका चित्रपटात आव्हानात्मक सहभाग…मला पुढे जाण्याची गरज आहे…माझ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी भाई आलिम हकीम आणि ब्लूज यांचे खूप खूप आभार.”
अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांनी अजुन लग्न केलेलं नाही. या दोघांनाही २०१९ मध्ये मुलगा झाला असून त्याचं नाव अरिक आहे. गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिने तिच्या प्रेग्नंसीची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.