सलमान खान आणि अनुष्का शर्माच्या आगामी बहुचर्चित ‘सुलतान’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘बेबी को बेस पसंद है’ असे गाण्याचे बोल असून या गाण्याद्वारे अनुष्काच्या ‘बॅण्ड बाजा बारात’ चित्रपटाच्या आठवणी जाग्या होतात. त्या चित्रपटातही अनुष्का ही पटियाला सलवार-कुर्तामध्ये दिसली होती.
सलमान-अनुष्काच्या रुपात बॉलीवूडला नवी जोडी मिळाली आहे. ‘बेबी को बेस पसंद है’ गाणे लग्नाच्या वातावरणात चित्रीत करण्यात आलेय. लग्नात पाहुणा म्हणून आलेला सुलतान (सलमान) हा अरफाला (अनुष्का) पाहून वेडा होता. त्यानंतर तो अरफाला आपल्या नृत्याने पटवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, अरफा त्याला काही भाव देत नाही, असे गाण्यात दाखविण्यात आलेयं.
या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन फराह खानने केले असून त्यास विशाल-शेखरने संगीत दिले आहे. विशाल दादलानी, शाल्मली खोलगडे, इशिता आणि बादशाह यांनी हे गाणे गायले आहे. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला ‘सुलतान’ चित्रपट ईदच्या मुहुर्तावर ६ जुलैला प्रदर्शित होईल.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: ‘सुलतान’मधील ‘बेबी को बेस पसंद है’ गाणे
लग्नात पाहुणा म्हणून आलेला सुलतान हा अरफाला पाहून वेडा होता.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 31-05-2016 at 15:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby ko bass pasand hai song from sultan featuring salman khan and anushka sharma