Rajamouli’s Seven Must Watch Movies : राजामौली हे साऊथमधील मोठं नाव आहे. एस. एस. राजामौली हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अनेक दिग्दर्शकांचे ते प्रेरणास्थान आहेत, तर अनेकांना त्यांच्याबरोबर काम करायचं आहे.
राजामौली सध्या त्यांच्या ‘वाराणसी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटात महेश बाबू झळकणार आहे, तर या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्राही झळकत आहे. यामधून ती भारतीय सिनेमात पुनरागमन करत आहे. सध्या राजामौलींच्या या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या पूर्वीसुद्धा त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत ते चित्रपट.
बाहुबली – राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याची सर्वत्र क्रेझ निर्माण झालेली. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेतून झळकलेला. या चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित झाला. या चित्रपटातील संवाद, पात्र यांची अजूनही प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती.
RRR – राजामौली दिग्दर्शित आरआरआर या चित्रपटाचं फक्त भारताच नव्हे तर जगभरात कौतुक झालं होतं. मनोरंजनक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाला मिळाला. यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत, तर बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टही या चित्रपटातून झळकलेली. या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील दोन भारतीय क्रांतिकारकांवर आधारित आहे.
Magadheera – राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता राम चरण व काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत झळकलेले. या चित्रपटात दोघांचे दोन जन्म दाखवले असून एतिहासिक प्रेमकहाणी यामध्ये पाहायला मिळते. पूर्वीच्या जन्मात अपूर्ण राहिलेली प्रेमकहाणी दुसऱ्या जन्मात पूर्ण होते, असं या चित्रपटात पाहायला मिळतं.
Eega – ही एक सूडकथा आहे, ज्यात नायिका एक माशी आहे, जी बदला घेण्यासाठी प्रयत्न करत असते. राजामौली यांची कल्पकता आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता या कथेतून स्पष्ट दिसते. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
sye – राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता नितीन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात कबड्डीला महत्त्व देण्यात आलं आहे आणि क्रीडा या गोष्टींचं महत्त्व पटवून दिलं आहे.
simhadri – या चित्रपटाने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कथानकाने आणि रोमांचक अॅक्शन दृश्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. यातील ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा झालेली. राजामौलींनी दिग्दर्शन केलेल्या लोकप्रिय चित्रपटांपैकी हा एक आहे.
Chatrapathi – प्रभासची मुख्य भूमिका असलेला हा एक दमदार अॅक्शन ड्रामा आहे. ही स्वत:ची ओळख गमावलेल्या नायकाची कथा आहे, जो अत्याचाराविरुद्ध उभा राहून स्वतःची ओळख परत मिळवतो आणि आपल्या लोकांचे रक्षण करतो.
