Bharti Singh On Second Pregnancy : कॉमेडी क्वीन भारती सिंगने काही दिवसांपूर्वी ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे सांगितले. ती तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल वारंवार अपडेट देते. अभिनेत्रीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्लॉग शेअर केला, ज्यामध्ये चाहत्यांना तिच्या दिवाळीच्या तयारीची झलक दाखवण्यात आली. दिवाळीच्या तयारीबद्दल बोलताना तिने अनेक खुलासे केले.

भारती सिंगने तिचे संपूर्ण घर कसे सजवले ते सांगितले. लायटिंगपासून ते फुले आणि दिव्यांपर्यंत, भारतीने सर्व काही केले आणि त्याची एक झलक तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. त्यामुळे चाहते आनंदित झाले आणि त्यांनी भारतीच्या सुंदर सजावटीचे कौतुक केले.

दिवाळीमध्ये भारती तिच्या कुटुंबाबरोबर आनंदाचे क्षण अनुभवत असली तरी तिला दुसऱ्यांदा आई होण्याच्या प्रवासात काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये भारती सिंगने याबद्दल खुलासा केला.

भारती म्हणाली, “पुढील दिवाळीपर्यंत मला आणखी एक मूल होईल यावर माझा विश्वास बसत नाही. मला आशा आहे की, ती मुलगी असेल. म्हणजे जोपर्यंत बाळ निरोगी आणि सुरक्षित आहे तोपर्यंत मी काहीही झाले तरी आनंदी राहीन. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला एक मुलगी हवी आहे. कल्पना करा की, गोलाने शेरवानी घातली आहे आणि तिने लेहेंगा किंवा पंजाबी सूट घातला आहे. मी खूप आनंदी आहे आणि बाळाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे.”

भारतीला होतोय त्रास

भारतीने दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने तिला अनेकदा श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे उघड केले. तिने तिच्या चाहत्यांना विचारले की, गर्भधारणेदरम्यान असे होते का? दुसऱ्या मुलाची अपेक्षा करताना तिला कसं वाटतंय, हेदेखील तिने सांगितले. ती म्हणाली, “मी खरेदी करायला गेली आणि माझ्या ओळखीच्या प्रत्येकानं माझं गर्भवती झाल्याबद्दल अभिनंदन केलं. सर्व जण माझे अभिनंदन करीत आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला.” भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी काही दिवसांपूर्वीच एका खास पद्धतीने त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती.

भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ साली लग्न केलं होतं. त्यांना लक्ष्य नावाचा एक मुलगा आहे. लक्ष्यचा जन्म ३ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. लक्ष्य साडेतीन वर्षांचा झाला आहे. आता भारती पुन्हा गरोदर आहे.