scorecardresearch

भारती सिंह

भारती सिंह (Bharti Singh) ही हिंदी सिनेसृष्टीमधील एक अभिनेत्री आणि कॉमेडियन आहे. ३ जुलै १९८४ रोजी तिचा जन्म अमृतसरमध्ये झाला. भारती अवघी दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या जाण्यामुळे तिच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तिचे बालपण गरीबीमध्ये गेले. मोठी स्वप्न बाळगणाऱ्या भारतीला ‘द ग्रेट लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामुळे ओळख मिळाली. ती या कार्यक्रमामध्ये उपविजेते होती. पुढे तिने अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करायला सुरुवात केली. विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे तिच्या कामाचे कौतुक होऊ लागले.

‘खतरों के खिलाडी’, ‘झलक दिखला जा’, ‘द कपिल शर्मा शो’ यांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती झळकली आहे. ती सूत्रसंचालन देखील करते. २०१७ मध्ये तिने लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. लग्नापूर्वी बरीच वर्ष ते एकमेकांंना डेट करत होते. त्यांनी मिळून ‘नच बलिये’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. एप्रिल २०२२ मध्ये भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बाळाचे नाव त्यांनी ‘लक्ष्य’ असे ठेवले असले तरी ते लाडाने त्याला ‘गोला’ म्हणून हाक मारतात.

२१ नोव्हेंबर २०२० रोजी अमली पदार्थविरोधी पथकाने भारतीच्या राहत्या घरावर छापा मारला. यामध्ये त्यांनी ८६.५ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी भारती आणि हर्ष यांना अटक करण्याच आले. दोन दिवसांच्या चौकशीनंतर २३ नोव्हेंबर रोजी त्या दोघांनाही जामीन मिळाला.
Read More

भारती सिंह News

bharti singh son
Video: भारती सिंहच्या लेकाला ‘RRR’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंद, लक्ष्यने ‘नाटू नाटू’वर केलेला जबरदस्त डान्स पाहिलात का?

आता तिने पोस्ट केलेला लेकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

bharati singh news
“शूटिंगमध्ये असतानाच प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या अन्…” कॉमेडियन भारती सिंहने सांगितला ‘तो’ प्रसंग

भारती सिंहने सांगितला गरोदरपणातील अनुभव

bharti
Video: “जय श्री कृष्ण” म्हणताच भारती सिंहच्या लेकाने केलं असं काही की ते पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक, व्हिडीओ व्हायरल

तिचा मुलगा लक्ष्य हा १० महिन्यांचा आहे.

bharti singh video, bharti singh son gola video, bharti singh news, bharti singh haarsh limbachiyaa, bharti singh gola haarsh, bharti singh baby, भारती सिंह, भारती सिंह मुलगा, लक्ष्य, भारती सिंह इन्स्टाग्राम
Video: भारती सिंहच्या मुलाने केलेल्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी फिदा; म्हणाले, “असे संस्कार…”

भारती सिंहच्या लेकाचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

malaika bharti
“तुम्ही काय तिचे…” मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगचं सडेतोड उत्तर

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे होत आहेत. यामुळे अनेकदा तिला ट्रोलही केलं जात आहे.

rakesh roshan dance with bharti singh
Video: भारती सिंगसह राकेश रोशन यांचा रोमॅंटिक गाण्यावर डान्स, हृतिक रोशन व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

राकेश रोशन ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ शोमध्ये हजेरी लावली.

bharti singh business bharati singh
Video : पंजाबमध्ये कारखाना, रिसॉर्ट, लाखो रुपयांची कमाई अन्…; टीव्ही शो व्यतिरिक्त भारती सिंह करते ‘हा’ व्यवसाय

भारती सिंहने पंजाबमध्ये सुरु केलेला व्यवसाय आणि त्यादरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे.

bharti singh pregnancy bharti singh news
मुलाचा जन्म झाला अन् १२ दिवसांमध्येच कामावर परतली भारती सिंह, म्हणाली, “काम केलं नाही तर…”

भारती सिंहने आई झाल्यानंतर लगेचच काम करण्यास सुरुवात का केली? याबाबत सांगितलं आहे.

भारती सिंह Photos

Kapil Sharma, bharti singh,
9 Photos
Photos : भारती सिंग ते कपिल शर्मा…महागड्या गाड्यांमधून फिरतात ‘हे’ टीव्ही स्टार्स; गाडीची किंमत ऐकून थक्क व्हाल

छोट्या पडद्यावरील कलाकारांना देखील महागड्या गाड्या खरेदी करण्याचा छंद आहे. या गाड्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

View Photos
ताज्या बातम्या