प्रवीण तरडे 'बिग बॉस'मध्ये दिसणार का?; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले "पूर्ण घर डोक्यावर..." | big boss marathi new season host actor director mahesh manjrekar says pravin tarde siddharth jadhav rock this show see details | Loksatta

प्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का?; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”

मराठी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये कोणते स्पर्धक सहभागी झाले पाहिजे याबाबत महेश मांजरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

प्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का?; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”
मराठी 'बिग बॉस'च्या घरामध्ये कोणते स्पर्धक सहभागी झाले पाहिजे याबाबत महेश मांजरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. टीव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त शो प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. ‘बिग बॉस’च्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. स्पर्धकांमधील मैत्री, प्रेम, राडे, विविध टास्क ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वामध्ये पाहायला मिळतील. ‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम आहे. दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकरच हा शोचे सुत्रसंचालक असतील. ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वामध्ये कोणते कलाकार असले पाहिजे? याबबात महेश मांजरेकर यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले महेश मांजरेकर?

हिंदी ‘बिग बॉस’ प्रमाणे मराठी ‘बिग बॉस’ही चर्चेचा विषय ठरतं. मराठी ‘बिग बॉस’चं मागचं पर्व तर प्रचंड गाजलं. आता २ ऑक्टोबरपासून मराठी ‘बिग बॉस’चं नवं पर्व सुरु होत आहे. पण त्यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील कोणत्या कलाकारांनी या घरामध्ये सहभागी झालं पाहिजे? याबाबत महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर म्हणाले, “सर्वप्रथम तर ‘बिग बॉस’च्या घरामध्ये सगळ्यात जास्त धमाल करेल तो म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थनंतर दुसरा व्यक्ती या घरामध्ये धमाल करेल तो म्हणजे प्रवीण तरडे. हे दोघं जर ‘बिग बॉस’मध्ये असतील तर पूर्ण घर डोक्यावर घेतील. त्याचबरोबरीने जितेंद्र जोशीदेखील घरामध्ये धमाल करेल. त्याच्या कवितांनी तो घरामध्ये मैफिल रंगवेल. पण सिद्धार्थ-प्रवीण हा शो वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील.”

आणखी वाचा – कित्येक वर्ष काम नाही, आर्थिक परिस्थिती बिकट अन्…; संजय कपूर यांच्या पत्नीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

पुढे ते म्हणाले, “सई ताम्हणकरलाही मला ‘बिग बॉस’च्या घरामध्ये बघायला आवडेल. कारण तिला कोणत्याच गोष्टी लपवता येत नाही. तिच्या चेहऱ्यावर पटकन दिसून येतं. सईची हिच गोष्ट मला आवडते.” महेश मांजरेकर यांनी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये कोण असावं? याबाबत आपलं मत मांडलं. पण आता नक्की कोणते स्पर्धक या शोमध्ये सहभागी होणार याबाबत २ ऑक्टोबरला कळेलच.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
निर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप

संबंधित बातम्या

‘अवतार २’ बघताना प्रेक्षकांनी टॉयलेटला कधी जावं? दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचं भन्नाट उत्तर
“बाळासाहेब ठाकरेंमुळेच आज मी…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतचा मोठा खुलासा
‘आई कुठे काय करते’मधील ‘या’ अभिनेत्रीने सुरू केला नवीन बिझनेस
“हिरोला नग्न दाखवू शकत नाही पण स्त्रीला नग्न दाखवले तर…”; स्मिता पाटील यांचं ‘ते’ बोल्ड विधान पुन्हा चर्चेत
सोनाक्षी सिन्हासोबत अफेअरच्या चर्चांवर जहीर इक्बालनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती