Awez Darbar on Amaal Mallik : ‘बिग बॉस १९’ हा शो सध्या टेलिव्हिजनवर वर्चस्व गाजवत आहे. चाहते या शोबद्दल सतत उत्सुक असतात. शिवाय सलमान खानच्या शोमध्ये स्पर्धकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला आहे. घरात अनेक स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे. अमाल मलिक आणि आवेज दरबार यांच्यातही असाच वाद पाहायला मिळाला आहे.

आवेजने नुकताच शो सोडला. ‘बिग बॉस १९’ च्या घरात असताना, अमालने आवेजवर अनेक आरोप केले होते, त्याच्या कामावरही टीका केली होती. आता शो सोडल्यानंतर आवेजने अमालच्या सर्व टिप्पण्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय आवेजने अमालशी केलेल्या चॅटदेखील दाखवल्या आहेत.

आवेज दरबार काय म्हणाला?

‘बिग बॉस १९’ मधून बाहेर पडल्यानंतर आवेज दरबार नियमितपणे मुलाखती देत आहे. त्याची एक नवीन मुलाखत सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याने अमाल मलिकबद्दल प्रतिक्रिया दिली. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आवेजला अमाल मलिकबद्दल विचारण्यात आले, ज्याने ३० दशलक्ष फेक असल्याचे म्हटले होते. तुम्ही त्यावर काय म्हणाल? हे ऐकून आवेजने लगेच उत्तर दिले, “मी तुम्हाला अमालचा डीएम दाखवतो, ज्यामध्ये भाईजान (अमाल) ने मला प्रथम मेसेज केला होता. त्याच्याबरोबरचा आमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यामुळे तो म्हणाला की आपण एकत्र असे काहीतरी बनवावे ते व्हायरल होईल.” मी म्हणालो, “हो, का नाही?”

आवेज पुढे म्हणाला, “त्यानंतर मी एक वर्ष तो मेसेज पाहिला नाही, म्हणून मी अजिबात उत्तर दिले नाही; पण असे नाही की मी ते जाणूनबुजून केले. मी ते पाहिले नाही, कारण मी बहुतेक वेळा डीएम तपासत नाही. आता जेव्हा त्याने स्टोरी मेन्शन केली, तेव्हा त्याच्या मॅनेजरकडे काही काम होते, जसे की व्हिडीओ बनवणे. त्यानंतर जेव्हा मी व्हिडीओ बनवला आणि तो स्टोरीवर पोस्ट केला, तेव्हा मला ते सर्व मेसेज दिसले. मग मी लिहिले, “कधीही भाऊ,” त्यानंतर आवेजने ते सर्व मेसेज कॅमेऱ्यासमोर दाखवले.

सध्या ‘बिग बॉस १९’ हा रिअॅलिटी शो प्रचंड गाजतोय. सलमान खान होस्ट करत असलेल्या शोने टीआरपीच्या स्पर्धेतही मोठी झेप घेतली आहे. ‘बिग बॉस १९’च्या घरातून ‘वीकेंड का वार’वेळी स्पर्धक आवेज दरबार शोमधून बाहेर पडला.