‘बिग बॉस ओटीटी’ ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. घरातील प्रत्येक सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रचंड प्रमाणात मेहनत घेत आहेत. बिग बॉस ओटीटीमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे ट्विस्ट होतं आहेत. घरातील एक एक सदस्य घराबाहेर पडत आहे. मात्र आता ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरात बोल्डनेसचा तडका लागणार आहे. लवकरच या शो मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून अभिनेत्री निया शर्माची एंट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘बिग बॉस ओटीटी’च्या यादीत ‘नगिन’ फेम अभिनेत्री निया शर्माच नावं पहिल्या दिवसांपासूनच चर्चेत होतं. मात्र आता निया बिग बॉस ओटीटीच्या घरात तिचा जादू दाखवणार आहे. लवकरच ती वाइल्ड कार्ड स्पर्धकाच्या रूपात घरात एंट्री घेऊन इतर स्पर्धकांना टक्कर देणार आहे. नियाने ‘एक हजारो में मेरी बेहना हैं’, ‘जमाइ राजा’, ‘ट्विस्टेड’ सारख्या अनेक मालिकेमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ती तिच्या बोल्ड अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करते असते आणि त्यासाठी ती नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. निया तरीही न घाबरता बिंदास्त पणे हे फोटो पोस्ट करत वेळोवेळी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देते. तिचा हा बिंदास्तपणा आता प्रेक्षक ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात पाहू शकणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’ च्या एका प्रोमोमध्ये शेवटी नियाच्या एंट्रीची घोषणा केली होती. तसंच आता वूटने देखील त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे.
‘बिग बॉस ओटीटी’ शो चा होस्ट करण जोहरने वीकएंडला घोषणा केली होती. की येणाऱ्या आठवड्यात घरात वाइल्ड कार्ड सदस्यांची एंट्री होणार आहे. सर्वानां असं वाटलं की कोणी तरी पुरुष स्पर्धक येणार आहे कारण दिव्या आगरवाल एकटी अशी स्पर्धक आहे जिला जोडीदार नाही आहे. मात्र बिग बॉसच्या निर्मात्यांच्या मनात काही तरी वेगळा प्लान आहे.
‘बिग बॉस ओटीटी’ या शोमधील ट्विस्ट पाहून प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. आता या वादग्रस्त घरात नियाच्या एंट्रीने बोल्डनेस सोबत अजून कोणकोणत्या गोष्टीचा तडका लागतो आहे हे येणारी काळ ठरवेल. ‘बिग बॉस ओटीटी’हा शो तुम्ही रोज रात्री ९ वाजता वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.