अर्जुन कपूरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केला संताप, म्हणाले “कोणत्याही धर्मावर…”

अर्जुन कपूरने सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर संताप व्यक्त केला होता.

अर्जुन कपूरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केला संताप, म्हणाले “कोणत्याही धर्मावर…”
अर्जुन कपूरने सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर संताप व्यक्त केला होता.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड सुरु आहे. आमिर खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांसारख्या अनेक दिग्गजांच्या चित्रपटांवर ट्रोलर्सकडून बहिष्कार टाकला जात आहे. या मुद्द्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतंच अभिनेता अर्जुन कपूरने सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर संताप व्यक्त केला होता. ‘या सगळ्याचा आता अतिरेक होत असून हे फार चुकीचं आहे’, असे अर्जुन कपूर म्हणाला होता. नुकतंच त्याच्या या वक्तव्यावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकत घेण्यामागचे कारण काय? सैफ अली खानने केला खुलासा

मध्यप्रदेश गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे सिनेसृष्टीतील अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असतात. नुकतंच त्यांनी अर्जुन कपूरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, “एक फ्लॉप आणि हताश झालेला अभिनेता जनतेला धमकी देत असेल तर हे चांगले नाही. त्याने जनतेला धमकावण्यापेक्षा त्याच्या अभिनयावर लक्ष दिलं तर अधिक बरं होईल. जर अर्जुन कपूरमध्ये हिंमत असेल तर त्याने इतर कोणत्याही धर्मावर चित्रपट बनवावा आणि त्याबद्दल अपमानास्पद बोलून दाखवावं, तर मी त्यांच्या हिमतीला दाद देईन. याला स्वत:चे चित्रपट सांभाळता येत नाही आणि हा इतरांना धमक्या देतोय, हे चांगलं नाही. आता जनता जागरुक झाली आहे.”

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ या चित्रपटांच्या विरोधात सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’ ट्रेंड सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा होताना दिसत आहे. नुकतंच ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने यावर प्रतिक्रिया दिली होती.

“मला वाटतं आम्ही याबाबत गप्प राहून चूक केली आहे. आम्ही शांत राहिलो याचाच लोकांनी जास्त फायदा घेतला आहे. आम्ही असा विचार केला की, भविष्यात आमचं काम बोलेल. पण इथेच चूक झाली. आपल्याला माहीत असतं की प्रत्येक वेळी आपले हात खराब करण्याची गरज नसते. पण मला वाटतं आम्ही आतापर्यंत खूप सहन केलं आहे. आता लोकांना याची सवय झाली आहे आणि या सगळ्याचा आता अतिरेक होत आहे. हे फार चुकीचं आहे. इंडस्ट्रीतील लोकांनी आता याबाबत खरंच काहीतरी करण्याची गरज आहे.” असे अर्जुन कपूर म्हणाला होता.

“आता यांना धडा शिकवायलाच हवा…” बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूर भडकला

दरम्यान अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसला होता. आगामी काळात त्याचे ‘कुत्ते’ आणि ‘द लेडी किलर’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“प्रेम नसताना सेक्स करणं…” शरीरसंबंधांबाबत सिद्धार्थ मल्होत्राचं वक्तव्य चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी