बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांच्या यादीत अभिनेता आयुषमान खुरानाने आपले स्वतःचे असे स्थान निर्माण केलं आहे. तो सध्या यशाच्या शिखरावर आहे. आयुषमान खुराना हा एक उत्तम अभिनेता असून त्याने बऱ्याच वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आहे. गेले काही वर्ष त्याच्यासाठी खूप लकी ठरली आहेत. कारण त्याने ज्या चित्रपटात काम केले आहे त्या सगळ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की आयुष्मान कशी निवडतो त्याची स्क्रिप्ट?
आयुषमान खुराना आपली स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेतो. त्याला असे वाटते की त्याच्या चित्रपटातून देशाचे उत्तम रित्या प्रतिनिधीत्व झाले पाहिजे. स्क्रिप्ट निवडच्या वेळेस तो भारतीय लोकांच्या आयुष्यावर आधारित गोष्टी शोधतो. खऱ्या आयुष्यातील समस्या असलेले चित्रपट त्याला निवडायला आवडत. हेच कारण आहे की त्याचे चित्रपट सगळ्यांच्या पसंतीस पडतात. त्याच्या चित्रपटांतून फक्त भारत नाही तर विदेशात राहणाऱ्या भारतीयांना देखील देशा बद्दल कळलं पाहिजे किंवा ज्या लोकांना भारताबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील समजू शकतील, असे त्याला वाटतं.
सलग आठ चित्रपट हिट देणारा अभिनेता आयुषमानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले. तर तो सध्या ‘चंडीगढ़ करे आशिकी’ आणि ‘डॉक्टर जी’ या चित्रपटांवर काम करत आहे. तसंच अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘अनेक’मध्ये देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. दरम्यान आयुषमान खुरानाचे नाव ‘टाइम्स मॅगझीन’च्या जगातील प्रभावशाली व्यक्तिंंमध्ये सामील झाले आहे. जी की खूप अभिमानाची गोष्ट आहे.