BTS हा दक्षिण कोरियन बॉय बॅंड आहे ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोरियाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. भारतात देखील या बॅंडचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. बॉय बॅंडच्या चाहत्यांना ‘आर्मी’ या नावाने संबोधले जाते. BTS मध्ये एकूण ७ टॅलेंटेड गायक, संगीतकार, डान्सर आहेत. या सर्वांनी आपल्या अनोख्या म्युझिकने जगाला अक्षरशः वेड लावले आहे. किंम नाम जुन, जंगकुक, वि, जे होप, शुग, जीन, जिमिन हे या ग्रपमधील मेंबर्सची नावे आहेत. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी खुलासा केला आहे, की त्यांची मुलगी देखील BTS या ग्रुपची खूप मोठी फॅन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका वृतपात्राला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी मृदुला या दोघीही के-ड्रामाच्या खूप मोठ्या फॅन असल्याचे सांगितले आहे. तसंच त्या दोघीही अगदी आनंदाने कोरियन ड्रामा पाहत असतात असेही ते यावेळी म्हणाले. पंकज हे के-पाॅपबद्दल बोलताना म्हणाले की, “माझी पत्नी आणि मुलीला कोरियाला जाऊन त्या के-ड्रामामधील नटांना आणि त्या गायकांना भेटायची इच्छा आहे. का माहिती नाही पण ते खूप प्रसिद्ध आहेत. खरंतर मी त्या दोघींनाही सांगत असतो की, ते एका लहान देशाचे हिरो आहेत आणि आम्ही एका मोठ्या देशाचे कलाकार आहोत. त्यामुळे, तुम्ही आमच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

BTS या ग्रुपने अनेक वर्ल्ड टूर केल्या आहेत. तसंच त्यांचे ‘डायनामइट’ हे पहिलं इंग्रजी गाणं हे ‘ग्रॅमी’ या म्युझिक क्षेत्रातल्या अत्यंत मानाच्या अशा पुरस्कारासठी नामांकित देखील झालं होतं. यानंतर त्यांनी प्रदर्शित केलेलं ‘बटर’ आणि ‘परमिशन टु डान्स’देखील यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. नुकताच BTS ग्रुपमधील सर्वात छोटा सदस्य जंगकुकचा वाढदिवस होता. यावेळेस भारतात देखील त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor pankaj tripathi reveled that his daughter is army and she is into bts aad