बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे दिसते. नुकताच त्याच्या पत्नीने त्या दोघांचा एक गोड फोटो शेअर करत छान कॅप्शन दिले आहे. तिने शेअर केलेल्या पोस्ट वर आर माधवनने देखील मजेशीर कमेंट केली आहे.
अभिनेता आर माधवन आणि त्याची पत्नीमध्ये खूप छान मैत्रीचे नातं आहे. ते आत अनेक वर्षांपासून एकत्र आहेत आणि त्यांच्या पोस्टमधून त्यांच्यामध्ये असलेलं नातं स्पष्ट दिसून येतं. नुकताच सरिताने तिच्या इन्स्टाग्रामवर दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तिने छानसं कॅप्शन देत लिहिले की,”लग्न म्हणजे जेव्हा एक व्यक्ती नेहमी बरोबर असते आणि दुसरी व्यक्ती पती असतो.” सरिता माधवनच्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सरिताने ही पोस्ट शेअर करताच आर माधवनने देखील मजेशीर कमेंट केली आहे. त्याने लिहिले की,”मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे….” माधवनची ही प्रतिक्रिया पाहून नेटकऱ्यांना त्यांच्यामधील असलेला हा बॉन्ड आवडला आहे. ते कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या इमोजी पोस्ट करतना दिसत आहेत.
सरिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तर माधवनने निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली आहे. आर माधवनच्या काम बद्दल बोलायचे झाले तो अॅमेझॉन प्राइमवरील ‘ब्रेथ’ या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकला होता.