salman khan sold his luxury mumbai apartment : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान त्याच्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. मग त्याचा राग असेल, त्याचे अफेअर्स असतील किंवा त्याच्या काही सवयी.

अलीकडेच तो त्याचा पुढचा चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’च्या घोषणेमुळे चर्चेत आहे. आता बातमी येत आहे की, भाईजानने मुंबईतील त्याचे एक आलिशान अपार्टमेंट विकले आहे.

या अपार्टमेंटची डील कोट्यवधींमध्ये झाली आहे. सलमान खानची ही मालमत्ता कोणत्या भागात होती आणि किती कोटींमध्ये ही डील झाली याबद्दल थोडे अधिक जाणून घेऊया.

सलमान खानने त्याचे मुंबईतील अपार्टमेंट विकले

असे वृत्त आहे की, सलमान खानने वांद्रे पश्चिमेतील त्याचे एक आलिशान अपार्टमेंट विकले आहे. स्क्वेअर यार्ड्स.कॉम वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे सलमानच्या अपार्टमेंटच्या विक्रीची माहिती समोर आली आहे. सलमान खानचे हे घर वांद्रे पश्चिमेच्या पाली हिल या उच्चभ्रू परिसरात शिव अस्थान हाईट्स येथे होते. असे सांगितले जात आहे की, त्याने हे घर ५.३५ कोटी रुपयांच्या मोठ्या किमतीला विकले आहे.

सलमान खानचे हे अपार्टमेंट मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील निवासी भागात शिव अस्थान हाईट्स या इमारतीत होते. १२२.४५ चौरस मीटर जागेसह या अपार्टमेंटमध्ये तीन कार पार्किंगसाठी जागादेखील होती. सलमानच्या या अपार्टमेंटच्या विक्रीसाठी स्टॅम्प ड्युटी ३२.०१ लाख रुपये होती, तर नोंदणी शुल्क ३० हजार रुपये होते.

सलमान खानने हे अपार्टमेंट खूप पूर्वी कमी किमतीत खरेदी केले होते आणि आता त्याने ही मालमत्ता पाच कोटींहून अधिक किमतीत विकून मोठा नफा कमावला आहे. सलमान अजूनही त्याच्या कुटुंबासह वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याशिवाय त्याचे पनवेलमध्ये एक फार्म हाऊस आणि इतर अनेक उत्तम मालमत्ता आहेत.

या चित्रपटात दिसणार सलमान खान

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर सलमान खान शेवटचा ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमानबरोबर रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली होती. आता तो तिच्या आगामी चित्रपटावर काम करीत आहे. या चित्रपटात गलवान व्हॅलीचा संघर्ष दाखवला जाईल. सलमान खान या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे. सलमान या लूकमधील त्याचे अनेक फोटो शेअर करीत आहे. चाहत्यांना त्याचा लूक खूप आवडला आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक नुकताच समोर आला आहे, जो पाहून प्रेक्षकांमध्ये ‘बॅटल ऑफ गलवान’ची उत्सुकता वाढली आहे.