अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा आज वाढदिवस असून ती 18 वर्षांची झाली आहे. कुठल्याही आई-वडिलांसाठी मुलगी 18 वर्षांती होणं म्हणजे मोठी गोष्ट असते. मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच काजोलने नास्यासोबतचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहली आहे.
काजोलने मुलगी न्यासाचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती कॅप्शनमध्ये म्हणाली,” तुझा जन्म झाला तेव्हा मी खूप चिंतेत होते. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती आणि मी त्या सर्व भीती आणि चिंतेतून एकवर्ष काढलं. तू 10 वर्षांची झालीस तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी बराच काळ तर विद्यार्थी होते आणि परिस्थितीतून मार्ग काढायला शिकत होते. अखेर आज मी म्हणू शकते की मी खूप साऱ्य़ा आनंदाने पास झाली आहे. खूप उंच उड..इतरांसाठी तुझ्यातील चैत्यन्य कमी होऊ देऊ नकोस , तुझ्या सर्व गुणांचा वापर चांगल्या कामांसाठी कर.” अशा आशयाची पोस्ट करत काजोलने मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काजोलच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्री दिय मिर्झा आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेता अजय देवगण यानेदेखील न्यासासोबतच एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय आणि काजोलची मुलगी नास्या सध्या सिंगापूरमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करतेय. नास्या ही कायम बॉलिवूडपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.