बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिती ही चित्रपटांपेक्षा जास्त नवीन गाड्या खरेदी करण्यामुळे चर्चेत आहे. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या क्रितीने नुकतंच एक नवी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत कोट्यावधी रुपये आहे.

क्रिती सेनॉन ही प्रचंड कारप्रेमी आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लग्झरी गाड्या पाहायला मिळतात. नुकतंच क्रितीने एक महागडी मर्सिडीज-बेंज मेबॅक जीएलएस ६०० (Mercedes Maybach GLS 600) गाडी खरेदी केली आहे. ही गाडी खरेदी करणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. क्रितीच्या या गाडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

क्रितीच्या या गाडीचे फोटो आणि व्हिडीओ mercedes maybach in india यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोत ती गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये तिच्या नव्या गाडीसोबत उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर एका व्हिडीओत ती गाडी चालवत असल्याचे दिसत आहे.

क्रितीने काळ्या रंगाची गाडी खरेदी केली आहे. यापूर्वी अभिनेता रणवीर कपूर आणि अर्जुन कपूरनी ही नवीकोरी Maybach GLS600 SUV ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास २.४३ कोटी रुपये इतकी असल्याचे बोललं जात आहे. ही कार सर्वात महागडी आणि लग्झरी कार म्हणून ओळखली जाते. क्रितीने ही गाडी खरेदी केल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रिती ही लवकरच दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. ती दाक्षिणात्य सुपस्टार प्रभास आणि सैफ अली खानसोबत या चित्रपटात दिसणार आहे. त्यासोबतच ती बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याच्यासोबतही ‘भेडिये’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. हा एक कॉमेडी भयपट आहे.