बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री जरीन खान तिचा चित्रपट ‘हम भी अकेले तुम भी अकेले’साठी चांगलीच चर्चेत आहे. तिच्या ह्या चित्रपटाचे आयआयएफएफबी बोस्टन 2021 च्या फिल्म फेस्टिवलसाठी नामांकन झाले आहे. जरीन खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळे मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिने एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जरीनने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. हा तिचा थ्रोबॅक व्हिडीओ असून ती यात एका लहान मुलासारखी ट्रॉलीमध्ये बसून मॉलमध्ये फिरताना दिसत आहे. तिचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा थ्रोबॅक व्हिडीओ तिचा चित्रपट ‘1921’च्या शूटिंग दरम्यानचा आहे. या व्हिडीओत करण कुंद्रा ती ट्रॉली  पुढे ढकलताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन दिलं,” काश हे दिवस परत येतील, विक्रम भट्ट सर आम्हाला सहन केल्या बदल तुम्हाला सॅल्यूट आहे.”

जरीन खानच्या या मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचे फॅन्स यावर कमेंट करुन त्यांच्या रिअॅक्शन देताना दिसत आहेत. दरम्यान जरीन खानने २०१० मध्ये सलमान खानचा चित्रपट ‘वीर’ बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसंच २०१७ साली ती ‘अक्सर २’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली होती. बॉलिवूड सोबतच जरीन खानने तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती अभिनेता प्रिन्स नरुला सोबत म्युझिक व्हिडीओ मध्ये दिसले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress zareen khan shares funny throwback video on instagram went viral add