करोनाच्या दुसऱ्या लाटेचा थैमान सुरू असतानाच ब्लॅक फंगस सारख्या नव्या आजाराने दहशत निर्माण करण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत लोकांना ऑक्सिजन आणि बेड्ससाठी देखील अडचणीचा सामना करावा लागतोय. या कठीण काळात बॉलिवूडमधील कलाकार सोनू सूद, अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अक्षय कुमार लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यापाठोपाठ ‘जन्नत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री सोनल चौहानने देखील मदतीचा हात पुढे केला. शनिवारी दुपारी तिने एका मंदिराबाहेरील गरिबांना बिस्कीट आणि पाणी वाटप केलं होतं. याचा तिने एक व्हिडीओ देखील शूट केला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतानाच आता तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतोय.

सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त करत तिने पब्लिसिटीसाठी बिस्कीट वाटप केल्याचा आरोप केलाय. काही युजर्सनी तर तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत कॅमेरासमोर न येता गरीबांची सेवा करण्याचा सल्ला देखील दिलाय. काही युजर्सनी तर तिला गरिबांसाठी डाळ, तांदुळ आणि फळांचं वाटप करण्यासाठी सांगितलं.

अशी होतेय ट्रोल सोनल चौहान
एका युजरने लिहिलं, “स्वतःच्या केसांची जास्त काळजी आहे,कॅमेरासाठी चॅरिटी जास्त दिसून येतेय”. आणखी एका युजरने कमेंट केलंय की, “द्यायचं असेल तर पोटभर जेवण द्या, पार्ले जी बिस्कीटने कुणाचं पोट भरतं का ?”. आणखी एका युजरने लिहिलं, “पब्लिसिटीसाठी केलंय हे”. दुसऱ्या एका इन्स्टा युजरने कमेंट करत लिहिलं, “मला असं म्हणायचंय की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचा तुम्हाला प्रचारंच करायचा असेल तर गरिबांना पोटभर जेवण तरी द्या.”

(Photo: Instagram@viralbhayani)

 

ट्रोलिंगसोबतच काही युजर्सनी केलं कौतूक
सोशल मीडियावर ट्रोलिंसाठी नेटकऱ्यांची टार्गेट बनल्यानंतर काही फॅन्सनी तिच्या या उपक्रमाचं कौतूक देखील केलं. करोनाच्या दुसऱ्या लाटेत भूखेने व्याकूळ झालेल्या गरिबांना बिस्कीट वाटप केल्याबद्द्ल तिचं कौतूक करत तिला पाठींबा देखील दिला आहे. अशाच पद्धतीने महामारीच्या काळात गरीबांना मदत करण्यासाठी तिनं प्रोत्साहन देखील केलंय. यासाठी तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.

 

जितकं शक्य होईल तितकी गरिबांना मदत करा…
या स्टोरीमध्ये सोनल चौहानने लिहिलं, “गरीबांना मदत करण्यासाठी तुमच्याकडून जे जे शक्य होईल ते सर्व करा…जर आपण या सर्वांना एकत्र येऊन मदत केली तर रस्त्यावर कुणीच गरीब उपाशी पोटी झोपणार नाही. कारण काही जण कसे बसे भूक भागवतात, पण काही जणांकडे आपली भूक भागवण्यासाठी पर्याय उपलब्ध नसतो.”

(Photo: Instagram@sonalchauhan)

सोनल चौहानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर २००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘जन्नत’ चित्रपटाता अभिनेता इमरान हाश्मी सोबत ती दिसून आली. त्यानंतर ‘जन्नत गर्ल’ म्हणून लोकप्रिय झाली. यासोबत तीने ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘पहिला सितारा’, ‘३जी’, ‘पलटन’, ‘जॅक अॅण्ड दिल’ यासारख्या चित्रपटात देखील काम केलंय. हे चित्रपच जास्त चालले नाही, पण सोनलने तिच्या अभिनयाची जादू परसवत फॅन्सचं मन जिंकलं होतं. तिने फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर टॉलिवूडमध्ये देखील काम केलंय. याच वर्षी रिलीज झालेल्या ‘द पावर’ या चित्रपटात देखील ती झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता विद्यूत जामवाल आणि श्रुती हसन देखील दिसून आले.