बॉलीवूडमध्ये असे अनेक सुपरस्टार आहेत की, ज्यांची नावे भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत घेतली जातात. आपल्या एका चित्रपटासाठी हे कलाकार जवळपास १०० कोटी रुपयांचे मानधन घेतात. अनेकदा या कलाकारांमध्ये मानधनावरूनही चढाओढ बघायला मिळते. मात्र, बॉलीवूडमध्ये असा एक सुपरस्टार आहे की, ज्याच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती आहे. मात्र, अजूनही त्याचे नाव श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत घेतले जात नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा अभिनेता दुसरा-तिसरा कुणी नसून बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त आहे. संजय दत्तने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी’ चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, १९८६ मध्ये ‘नाम’ चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. आतापर्यंत त्याने १०० पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. एका चित्रपटासाठी तो आठ ते नऊ कोटी रुपये मानधन आकारतो; तर जाहिरातींसाठी पाच ते सहा कोटी रुपये फी घेतो. मिळालेल्या माहितीनुसार- संजय दत्तची एकूण संपत्ती जवळपास ३०० कोटी रुपये आहे.

संजय दत्त मुंबईच्या पॉश अशा पाली हिल्स या भागात पत्नी मान्यता दत्त व त्यांच्या दोन मुलांबरोबर राहतो. दैनिक ‘भास्कर’च्या वृत्तानुसार या घराची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे. संजय दत्तचे मुंबईतील घर हे आधुनिक आणि ८० च्या दशकातील बॉलीवूड सौंदर्यशास्त्राचे मिश्रण आहे. संजय दत्तच्या घराचे इंटेरियर डिझाईन खूपच आकर्षक आहे. संजय दत्त त्याच्या आई-वडिलांजवळ असल्याने त्याच्या घरात सुनील दत्त आणि नर्गिस यांचे पोर्ट्रेट, स्वतःचे भित्तीचित्र आणि इतर उत्कृष्ट कलाकृतींचा साठा आहे. त्याच्या घरात जिम, बारसाठी स्वतंत्र जागाही आहे.

मुंबईबरोबर दुबईतही संजय दत्तचे आलिशान घर आहे. अनेकदा तो आपल्या सोशल मीडियावर दुबईतील घराचे फोटो शेअर करीत असतो. तसेच तो दुबईस्थित प्रॉपर्टी डेव्हलपर कंपनी डॅन्यूबचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडरही आहे. अभिनेत्याबरोबर संजय दत्त एक व्यावसायिकही आहे. अलीकडेच त्याने कार्टेल आणि ब्रदर्स नावाच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून अल्कोबेव्ह ब्रॅण्ड लाँच केला. तो द ग्लेनवॉक या स्कॉच व्हिस्की कंपनीचा मालक आहे.

हेही वाचा- तब्बल ६४ वर्षांनी धर्मेंद्र यांनी आपल्या नावात केला मोठा बदल, आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

संजय दत्तला खेळाची खूप आवड आहे. २०२३ मध्ये झिम आफ्रो T10 लीगमधील हरारे हरिकेन संघ खरेदी केला आणि एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक सोहन रॉय यांच्याबरोबर तो क्रिकेट संघाचा सह-मालक बनला. संजय दत्तचा श्रीलंकेच्या बी-लव्ह कँडी नावाच्या प्रीमियर लीग संघातही हिस्सा आहे. तसेच त्याच्याकडे फेरारी 599 GTB, रोल्स रॉयल घोस्ट, मर्सिडीज, डुकाटी, पोर्श, लॅण्ड क्रूझर यांसारख्या लक्झरी कारचा संग्रह आहे

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 crore home mumbai villa dubai 2 cricket teams but not richest actor know the supersatr net worth dpj