बॉलीवूड अभिनेता आमिर खानने अलीकडेच पंजाबी चित्रपट ‘कॅरी ऑन जट्टा ३’ च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ट्रेलर लॉंच झाल्यावर आमिरने या चित्रपटातील सगळ्या कलाकारांसाठी आपल्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. कॉमेडियन कपिल शर्मासुद्धा या पार्टीला उपस्थित होता. अर्चना पूरण सिंहने या पार्टीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विकी कौशलच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे बदलले पंजाबी गायकाचे आयुष्य, रातोरात झाला स्टार

अर्चना पूरण सिंहने या पार्टीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून यामध्ये कॉमेडियन कपिल शर्मा ‘हंगामा है क्यूं बरपा, थोडीसी जो पी ली है’ हे गाणे गाताना दिसत आहे. कपिलचा मित्र आणि त्याच्या शोमधील संगीतकार दिनेश, कपिलची पत्नी गिनी चतरथ, कॉमेडियन किकू शारदा, अभिनेत्री कविता कौशिक, सोनम बाजवा, आमिर खान, गिप्पी ग्रेवाल असे अनेक कलाकार या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

हेही वाचा : “जब प्यार किया तो डरना क्या” न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर परिसरात दुमदुमला मराठमोळ्या गायिकेचा आवाज

अर्चना पूरण सिंह हा व्हिडीओ शेअर करताना लिहिते की, “राजा हिंदुस्थानी चित्रपटानंतर अनेक वर्षांनी मी आमिरला भेटले. एवढ्या वर्षांनी भेट झाल्यावर अनेक जुन्या आठवणींना आम्ही उजाळा दिला. जुने मजेदार किस्से ऐकताना खूप मजा आली, या पार्टीचे आयोजन केल्याबद्दल आमिरचे मनापासून धन्यवाद….आणि ‘हंगामा है क्यूं बरपा..’ हे सर्वांचे आवडते गाणे गायल्याबद्दल कपिल शर्माचे खूप खूप आभार.” व्हिडीओमध्ये कपिलच्या हातात लिंबूपाणी आहे दुसरे काही नाही. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता असा खुलासाही अर्चनाने केला आहे.

हेही वाचा : मीरा राजपूतच्या ‘या’ सवयीचा शाहिद कपूरला आलाय कंटाळा; म्हणाला, “एवढी वर्ष झाली, पण…”

कपिल शर्मा अनेक वर्षांपासून त्याचा सेलिब्रिटी कॉमेडी शो चालवत आहे. या शोमध्ये शाहरुख, सलमान, प्रियांका चोप्रा, दीपिका, कतरिना, रणबीर, आलिया यांच्यासह जवळपास सर्वच मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. तसेच या कार्यक्रमात अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीही आले आहेत. पण, आमिर या शोमध्ये कधीच आला नाही. आमिरने अलीकडेच ‘कॅरी ऑन जट्टा ३’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात कपिलला सांगितले की, “तू मला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉल करतोस, त्यासाठी मी येणार नाही. तू मला असंच केव्हा तरी बोलव मी नक्की येईन.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan sings along with kapil sharma archana puran singh shares video sva 00