Premium

“आता सुपरस्टार होणं कठीण झालंय”, नाना पाटेकर यांनी बॉलीवूडविषयी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “बॉक्स ऑफिसच्या कमाईवरून…”

अभिनेते नाना पाटेकर यांनी बॉलीवूडविषयी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले…

nana patekar comments on end of superstardom era
नाना पाटेकर यांनी बॉलीवूडविषयी मांडलं मत

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाना पाटेकर सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. बॉलीवूडविषयी ते अनेकदा आपलं स्पष्ट मांडताना दिसतात. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकरांनी स्टारडमविषयी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : बाप्पाची खास मूर्ती, मराठीतून आरती अन्…, देशमुखांच्या घरचा बाप्पा पाहिलात का? रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं होतंय कौतुक

नाना पाटेकर सांगतात, “आजकाल बॉलीवूडमध्ये रोज नवे कलाकार पदार्पण करत आहेत आणि त्यांच्या अभिनयाचं सुद्धा लोक तेवढंच कौतुक करतात. त्यामुळे सुपरस्टार होणं खूप कठीण झालंय. अलीकडच्या काळात बॉक्स ऑफिसच्या कमाईवरून एखाद्या अभिनेत्याचं स्टारडम ठरवलं जातं. पण, आधीच्या काळात असं नव्हतं…तेव्हाचे दिग्गज कलाकार आजही आपल्या लक्षात आहेत. दिलीप कुमार साहेब, राज कपूर, देव आनंद या दिग्गजांना आपण कधीही विसरू शकत नाही.”

हेही वाचा : सुधा मूर्तींनी पाहिला ‘द व्हॅक्सिन वॉर’; प्रतिक्रिया देत म्हणाल्या, “कोव्हॅक्सिन म्हणजे काय हे सामान्य माणसाला समजणार नाही, पण…”

नाना पाटेकर पुढे म्हणाले, “आजकाल दर आठवड्याला लोकांचे आवडते कलाकार बदलतात. आता स्टारडम बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवरून मोजलं जातं. पण, ज्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळत नाही त्यांच्यासाठी ओटीटी हे एक नवं व्यासपीठ तयार झालेलं आहे. ओटीटीवर अनेक कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत आहे. तेव्हा आम्हाला अशी कामं मिळाली नाहीत. आता ओटीटीवर प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.”

हेही वाचा : ‘जवान’च्या सेटवर पहिल्या दिवशी ‘असा’ होता दीपिका पदुकोणचा लूक; दिग्दर्शक अ‍ॅटली म्हणाला, “कोणत्याही अभिनेत्रीला…”

दरम्यान, विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, रायमा सेन, पल्लवी जोशी, गिरीजा ओक गोडबोले, सप्तमी गौडा यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor nana patekar comments on end of superstardom era sva 00

First published on: 19-09-2023 at 19:38 IST
Next Story
बाप्पाची खास मूर्ती, मराठीतून आरती अन्…, देशमुखांच्या घरचा बाप्पा पाहिलात का? रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं होतंय कौतुक