अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आहे. तसेच तिच्या लव्ह लाईफचीही चांगलीच चर्चा सुरू आहे. अशातच तमन्नाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तमन्नाला एक चाहती भेटल्याचे दिसत आहे. त्या चाहतीने तमन्नासाठी असं काही केलं आहे, ज्यामुळे तमन्ना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तमन्नाच्या जबरा फॅन मुमेंटचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला चाहती तमन्नाला भेटवस्तू देऊन तिच्या पाया पडताना दिसतं आहे. त्यानंतर चाहती तिने हातावर काढलेला तमन्नाचा टॅटू दाखवते. या टॅटूच्या खाली ‘लव्ह यू तमन्ना’ असं लिहिलं आहे. हे पाहून तमन्ना भावुक होऊन चाहतीला मिठ्ठी मारते आणि म्हणते की, “थँक्यू, लॉट्स ऑफ लव्ह.”

आणखी वाचा – ‘द आर्चीज’नंतर मोठ्या पडद्यावर झळकणार बाप-लेकीची जोडी? शाहरुख खानची सुहानासाठी विशेष तयारी

आणखी वाचा – बॉलिवूड सोडून कॅनडात राहणाऱ्या ‘कोई मिल गया’ फेम रजत बेदीने व्यक्त केली नाराजी; म्हणाला “निर्मात्यांचे चेक…”

तमन्नाचा हा जबरा फॅन मुमेंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून एक युझर म्हणाला की, “नशीबवाल्यांना असा आदर मिळतो. तमन्ना तुला आणि तुझ्या चाहतीला ईश्वर नेहमी आनंदी ठेवो”, तर दुसरा युझर म्हणाला, “पाहा, तमन्नाला कोणताही अहंकार नाहीये. किती चांगल्या पद्धतीने आपल्या चाहतीला ती भेटत आहे.”

आणखी वाचा – नवाजुद्दीन सिद्दिकीने कंगना रणौतचं केलं कौतुक, इच्छा व्यक्त करत म्हणाला, “तिच्याबरोबर…”

दरम्यान, तमन्नाच्या ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटाबरोबर ‘जी करदा’ या वेबसीरिजची चर्चा सुरू आहे. तमन्नाची ही लोकप्रिय वेबसीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress tamannaah bhatia recently interacted with fan video viral pps