बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. अवघ्या महिनाभरातच चित्रपटाने देशांतर्गत २०३ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘दृश्यम २’ची यशस्वी घौडदोड पाहिल्यानंतर अजय देवगण भावूक झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दृश्यम २’ चित्रपटाने २०० कोटींची कमाई केल्यानंतर अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. अजय देवगणने त्याचा फोटो पोस्ट केला आहे. “’दृश्यम २’ चित्रपटाने २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे आणि अजूनही करत आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार. आमच्या चित्रपटाला एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद” असं म्हणत अजय देवगणने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा>>“आमचं कोकणही गेली १२ वर्षे…” समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

हेही वाचा>>‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची आयुष्मान खुरानासाठी खास पोस्ट, म्हणाली…

अभिजीत पाठक दिग्दर्शित १८ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला ‘दृश्यम २’ २०० कोटींची कमाई करणारा यंदाच्या वर्षातील तिसरा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. याआधी ‘ब्रह्मास्र’ व ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा गल्ला जमवला होता.

हेही वाचा>>राणादा-पाठकबाईंनंतर मालिका विश्वातील अभिनेत्याची लगीनघाई, गुपचूप उरकला साखरपुडा

‘दृश्यम २’ हा चित्रपट ‘दृश्यम’ या २०१५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. मल्याळम चित्रपट ‘दृश्यम’चा हा रिमेक आहे. या चित्रपटात अजय देवगणसह इशिता दत्ता, श्रीया सरन, तब्बू, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn shared emotional post after drishyam 2 enters 200 cr club box office kak