ajay devgn starrer drishyam 2 crossed 100cr in 7 days box office collection details | Loksatta

Dishyam 2 Box Office Collection: अजय देवगणचा ‘दृश्यम २’ सुपरहिट, पार केला १०० कोटींचा आकडा

Dishyam 2 Box Office Collection: पहिल्या आठवड्यात ‘दृश्यम २’ ने १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

drishyam 2 box office collection
दृश्यम २ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.(फोटो: इन्स्टाग्राम)

अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलरपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. ‘दृश्यम २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. ‘दृश्यम २’चे शो हाऊसफूल होताना दिसत आहेत.

पहिल्या दिवसापासूनच ‘दृश्यम २’ ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड सुरू आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.३८ कोटींची करत ‘दृश्यम २’ हा ‘ब्रह्मास्र’ नंतर पहिल्या दिवशी जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ‘दृश्यम २’ने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. सातव्या दिवशी दृश्यम २ने बॉक्स ऑफिवर ८ ते ८.५ कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा>> Video: आधी धक्का दिला, मग जोरात ढकललं; विकास सावंत व रोहित शिंदेमध्ये हाणामारी; बिग बॉसने सुनावली जेलमध्ये राहण्याची शिक्षा

हेही वाचा>> ‘गलवान’चा उल्लेख करत रिचा चड्ढाने केलं ट्वीट, नेटकऱ्यांची fukrey3 बॉयकॉट करण्याची मागणी

‘दृश्यम २’ने पहिल्याच विकेंएण्डला बॉक्स ऑफिसवर ६४.१७ कोटींचा गल्ला जमवला होता. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ‘दृश्यम २’ची जादू बॉक्स ऑफिसवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने सात दिवसांत तब्बल १०४ कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे.

हेही वाचा>> Video: भारती सिंगसह राकेश रोशन यांचा रोमॅंटिक गाण्यावर डान्स, हृतिक रोशन व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा ‘दृश्यम २’ सिक्वेल आहे. एका मल्याळम सिनेमाचा हा रिमेक आहे. मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. अजय देवगणसह ‘दृश्यम २’ मध्ये तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. 

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 09:36 IST
Next Story
Video : पार्टीत दारूने भरलेले ग्लास, टेबलावर चढून नाचली अन् आता बिकिनी परिधान करत केला डान्स, सुप्रसिद्ध गायिकेचे व्हिडीओ व्हायरल