राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सामाजिक विषयांवरचे मत त्या परखडपणे मांडताना दिसतात. त्या एक उत्तम गायिकाही आहेत. त्यांची सगळीच गाणी चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गायलेलं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं. आता त्या पाठोपाठ प्रजासत्ताक दिनाचं अवचित्य साधून एक देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत त्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या चाहत्यांना सांगत असतात. आता त्यांनी नुकतीच या गाण्याची एक छोटीशी झलक सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना हे सरप्राईज दिलं.

आणखी वाचा : गाण्यानंतर आता अमृता फडणवीस दिसणार चित्रपटात? खुलासा करत म्हणाल्या…

अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या नव्या गाण्याचा ट्रेलर आहे. या गाण्यात त्या पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत. अमृता फडणवीस यांनी आगामी बहुभाषिक ‘भारतीयन्स’ या चित्रपटातील ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’हे गाणं गायलं आहे. हे गाणं शेअर करत अमृता फडणवीस यांनी लिहिलं, “तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा! आगामी ‘भारतीयन्स’ या बहुभाषिक चित्रपटासाठी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गाणे गाणं हा मोठा सन्मान होता. श्री सत्य कश्यप यांचं अंगावर शहारा आणणारं हे संगीत सर्वांनी ऐकायलाच हवं.”

हेही वाचा : चित्रपटगृहात सुपरहिट पण IMDB वर निघाली ‘पठाण’ची हवा, ‘इतक्या’ प्रेक्षकांनी दिलं १० पैकी १ रेटिंग

तर काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस ‘मूड बना लिया’ या गाण्यांमध्ये झळकल्या होत्या. या गाण्यात त्यांचा हटके अंदाज दिसून आला होता. त्यापाठोपाठ आता लगेचच त्यांचं हे सारे जहाँसे अच्छा’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis released her new song sare jaha se achha rnv