Animal Box Office Collection Day 3: रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. त्यानंतर आता तिसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अॅनिमल’ रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५४.७५ कोटींचा व्यवसाय केला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५८.३७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर आता तिसऱ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे, त्यानुसार ‘अ‍ॅनिमल’ने रविवारी सर्व भाषांमध्ये ७२.५० कोटींची कमाई केली आहे. यापैकी ६४.८० कोटी रुपये हिंदी भाषेत कमावले आहेत.

“माझा मुलगा जर रणबीर कपूर किंवा आलिया भट्टइतका…”, परेश रावल यांनी केलेले विधान चर्चेत

‘अॅनिमल’ चित्रपटाने फक्त भारतातच २०२.५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचं वर्ल्डवाईड कलेक्शन अद्याप समोर आलं नाही. एकंदरीत चित्रपटाने तीन दिवसांत केलेली कमाई पाहता चित्रपट या आठवड्यात ५०० कोटींच्या जवळपास जाऊ शकतो. चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट आहे.

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…

या चित्रपटात रणबीर कपूरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पिता-पुत्राच्या विचित्र नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रचंड हिंसा आणि रक्तपात दाखविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal movie box office collection day 3 ranbir kapoor bobby deol hrc