scorecardresearch

Premium

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…

Animal box office collection day 1 : ‘अॅनिमल’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

Animal Movie box office collection day 17
अॅनिमल बॉक्स ऑफिस कलेक्शन

Animal box office collection day 1 : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ अखेर १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. प्रेक्षकांची तिच उत्सुकता चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली होती. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. तर ‘अ‍ॅनिमल’चं अॅडव्हान्स बुकिंग जोरदार झालं होतं.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने फक्त भारतातच नाही, तर परदेशातही जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, भारतात या चित्रपटाने तब्बल ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यापैकी ५०.५० कोटी फक्त हिंदी भाषेत कमावले आहेत. तर १० कोटी रुपये तेलुगू भाषेत कमावले आहेत. उर्वरित कमाई ही कन्नड व मल्याळम भाषेतली आहे. चित्रपटाच्या टीमने अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.

chamkila-movie-release-date
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार?
kabhi-haan-kabhi-naa
‘कभी हां कभी ना’च्या रिमेकमध्ये शाहरुख खानची भूमिका कुणी करावी? सूचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या, “हे पात्र…”
sooraj-barjatya
जेव्हा सूरज बडजात्या अभिषेक व करीनावर उखडले; दिग्दर्शकानेच सांगितला किस्सा, म्हणाले “मी माईक फेकला…”
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”

Animal Review: वडील-मुलाच्या विचित्र नात्याची, आजवर कधीही न ऐकलेली अन् पाहिलेली अस्वस्थ करणारी ‘हिंसक’ गोष्ट

हा चित्रपट जगभरात पहिल्याच दिवशी १०० कोटी रुपये कमावण्यात यशस्वी ठरला आहे. पहिल्याच दिवशी एवढी ग्रँड ओपनिंग करणारा हा बॉलीवूडचा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ८ रेटिंग मिळाले आहे. लोकांची क्रेझ पाहता शनिवार व रविवार या वीकेंडच्या दिवसांमध्ये चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असं दिसत आहे.

दरम्यान, हा चित्रपट पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित आहे. यात रणबीर कपूरने मुलाची तर अनिल कपूर यांनी त्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्याशिवाय यात बॉबी देओल रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoor starrer animal movie box office collection day 1 hrc

First published on: 02-12-2023 at 08:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×