अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पती विकी जैनबरोबर तिने लग्न केलं. अंकिता व विकी एकमेकांवर असणारं प्रेम सोशल मीडियाद्वारे व्यक्त करताना दिसतात. विकीचा वाढदिवस तर या दोघांनी दुबईमध्ये साजरा केला. यादरम्यानचा व्हिडीओही अंकिताने सोशल मीडियाद्वारे शेअर केला. आता या रोमँटिक कपलचा आणखी एक व्हिडीओ सगळीकचे चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेचा डंपरच्या धडकेत मृत्यू, चंद्रकांत पाटील ट्वीट करत म्हणाले…

अंकिता व विकी यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. लग्नानंतरचा प्रत्येक सणही दोघं अगदी आनंदाने साजरा करत आहेत. शिवाय या सेलिब्रिटी कपलचं फोटोशूटही सतत चर्चेत असतं. आता चक्क बाथरूमधील बाथ टबमध्ये दोघं रोमान्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

बाथटबमध्ये अंकिता-विकीचा रोमान्स
अंकिता व विकीने बाथ टबमध्ये खास फोटोशूट केलं. यादरम्यानचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता विकीच्या अधिक जवळ जाताना दिसत आहे. तसेच दोघंही रोमान्स करताना दिसत आहे. यावेळी अंकिताने परिधान केलेला ड्रेस विशषे लक्षवेधी आहे.

आणखी वाचा – प्रेम, लग्न, दोन वर्षांमध्येच घटस्फोट अन्…; नवऱ्यापासून विभक्त होताच सई ताम्हणकरने मित्र मंडळींना दिली होती पार्टी, म्हणाली, “आमच्या नात्यामध्ये…”

अंकिताने हा व्हि़डीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल करणाऱ्यास सुरुवात केली आहे. तुला लाज वाटत नाही का?, अशाप्रकारचे व्हिडीओ का पोस्ट करते? अंकिता आता दिखावा करत आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande vicky jain romantic video goes viral on social media trollers angry on actress see details kmd