‘भूल भुलैया ३’ फेम कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) पुन्हा एकदा ‘आशिकी ३’साठी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार, याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. तृप्तीने या चित्रपटासाठी लूक टेस्ट देऊन मुहूर्त शॉटही दिला होता, त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र, या चित्रपटाच्या दिग्दर्शक अनुराग बासू यांनी तृप्ती डिमरी या प्रकल्पाचा भाग नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर चाहते आश्चर्यचकित झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक रिपोर्टनुसार तृप्ती डिमरीला चित्रपटातून वगळल्याचे कारण ‘रोमँटिक चित्रपटासाठी आवश्यक असलेल्या निरागसता आणि साधेपणाचा तिच्यात दिसत नाही असे निर्मात्यांना वाटत असल्याने तिची निवड झाली नाही’ अशा चर्चा होत्या.

हेही वाचा…३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…

‘अॅनिमल’ चित्रपटातील तृप्तीच्या बोल्ड सीनमुळे ती ‘आशिकी ३’साठी योग्य नाही, असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले होते. मात्र, या अफवांवर अनुराग बासू यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत, तृप्तीला चित्रपटातून वगळण्याचे कारण तिच्या ‘तिच्यात न दिसणारी निरागसता ’ हे आहे का, या प्रश्नावर बासू म्हणाले, “ते खरं नाही,” आणि पुढे म्हणाले, “तृप्तीला सुद्धा हे माहीत आहे.”

तृप्तीच्या जागी ‘आशिकी ३’साठी आता नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू आहे. चित्रपटाचे शूटिंग जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याचे अपेक्षित आहे.

हेही वाचा…माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा

तृप्तीने रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळवली होती. मात्र, तिच्या रणबीर कपूरबरोबरच्या काही बोल्ड दृश्यांमुळे तिला टीकेचा सामना करावा लागला. रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तृप्तीने या टीकेमुळे आपल्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती, “मी ‘अॅनिमल’ नंतर सलग दोन-तीन दिवस खूप रडले. मला अशा प्रकारच्या टीकेची सवय नव्हती. हे अचानक घडले, आणि लोकांनी माझ्याबद्दल लिहिलेल्या गोष्टी फारच भयंकर होत्या. लोक किती विचित्र आणि खालच्या स्तरावर जाऊ शकतात, ते मी अनुभवले.”

हेही वाचा…“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…

सध्या तृप्ती विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘अर्जुन उस्तरा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सुरुवातीला या चित्रपटात तृप्तीबरोबर कार्तिक आर्यन झळकणार होता, पण आता शाहिद कपूर या भूमिकेत दिसणार आहेत. विशाल भारद्वाजबरोबर शाहिदने याआधी ‘हैदर’, ‘रंगून’ आणि ‘कमिने’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय, तृप्ती करण जोहरच्या ‘धडक २’मध्येही दिसणार असून ती सिद्धांत चतुर्वेदीसह मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag basu clarifies tripti dimri exit from aashiqui 3 said said the reason behind it psg