कार्तिक आर्यन बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) जन्म २२ नोव्हेंबर १९९० रोजी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर इथं झाला होता. त्याने नवी मुंबईतील डी वाय पाटील कॉलेजमधून इंजिनिअरींगची डिग्री पूर्ण केली आणि अभिनय करायचं ठरवलं. त्याने २०११ साली ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘आकाश वाणी’, ‘कांची’ चित्रपटांमध्ये दिसला. कार्तिक आर्यनला बॉलिवूडमध्ये खरी ओळख ‘प्यार का पंचनामा २’ या चित्रपटाने मिळवून दिली. यानंतर त्याने ‘गेस्ट इन लंडन’, ‘सोनू के टिटू की स्विटी’, ‘लुका छुपी’, ‘पती पत्नी और वो’, ‘लव्ह आज कल’, ‘धमाका’ या चित्रपटांमध्ये काम केलं.
२०२२ मध्ये बॉलिवूडमध्ये मोजक्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. त्यात कार्तिकच्या ‘भूलभुलैया २’ चित्रपटाचा समावेश होता. त्यानंतर त्याचे ‘फ्रेडी’ व ‘शेहजादा’ चित्रपटही प्रदर्शित झाले होते. Read More
बहुचर्चित ‘शहजादा’ चित्रपटाच्या तिकीटविक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रदर्शनपूर्व हा चित्रपट ८ कोटींची कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन सध्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान तो कोलकाताला पोहोचला. यावेळी चक्क कार्तिकने टॅक्सीवर…