बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटी त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च करतात. कलाकारांच्या सुरक्षेत असलेल्या बॉडीगार्ड्सना मोठी रक्कम पगार म्हणून दिली जाते. अलीकडेच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या बॉडीगार्ड्सच्या पगाराचा आकडा समोर आला आहे. अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या बॉडीगार्डचं नाव प्रकाश सिंह उर्फ ​​सोनू आहे. सोनूला अनुष्का व विराटच्या संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये पगार म्हणून दिले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: Athiya Shetty-KL Rahul च्या संगीत सोहळ्यात शाहरुखच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकले पाहुणे, पाहा व्हिडीओ

‘झूम’च्या वृत्तानुसार, प्रकाश सिंह उर्फ ​​सोनूचा वर्षभराचा पगार सुमारे १.२ कोटी रुपये आहे. म्हणजेच सोनूचा पगार अनेक मोठ्या कंपन्यांच्या सीईओंच्या सीटीसीपेक्षा जास्त आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी सोनू त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. दरवर्षी अनुष्का सोनूचा वाढदिवस साजरा करते. एकदा ‘झिरो’च्या सेटवर अभिनेत्रीने सोनूचा वाढदिवस साजरा केला होता.

सोनू फक्त अनुष्काच नाही तर विराट कोहलीचंही संरक्षण करताना दिसून येतो. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अभिनेत्री अनुष्का शर्मा आई होणार होती, तेव्हा सोनूने अभिनेत्रीचं चांगल्या प्रकारे संरक्षण केलं. करोना काळात सोनू पीपीई किट घालून अनुष्का शर्माचं संरक्षण करताना दिसला होता.

Athiya Shetty- KL Rahul मुंबईत देणार ग्रँड रिसेप्शन; ३ हजार पाहुण्यांना असेल निमंत्रण

विराट-अनुष्का आपल्या सुरक्षेसाठी मोठी रक्कम खर्च करतात. अनुष्का व विराटच्या सुरक्षेसाठी जोडपं त्याला वर्षाकाठी १.२ कोटी रुपये पगार म्हणून देतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma virat kohli bodyguard sonu aka prakash singh salary in crores hrc