अरिजीत सिंह हा बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. आशिकी २ मधील तुम ही हो गाणं गात चाहत्यांना वेड लावणारा अरिजीत तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. तो चित्रपटांसाठी पार्श्वगायन तर करतोच पण त्याशिवाय अनेक कॉन्सर्ट आणि म्युझिक शोमध्ये सादरीकरण करतो. त्याच्या शोच्या तिकीटांसाठी चाहत्यांनी गर्दी होते, इतकी अरिजीतची क्रेझ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच अरिजीत सिंहचा गुजरातमधील अहमदाबाद इथं कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. पण तिकीटं घेऊन कॉन्सर्टच्या ठिकाणी पोहोचलेल्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचं कारण म्हणजे कॉन्सर्ट संपल्यानंतर त्यांना चिखल आणि गलिच्छ रस्त्यावरून ये-जा करावी लागली.

Salman Khan Birthday: भाईजानच्या वाढदिवसाला ‘पठाण’ची हजेरी; सलमान-शाहरुखने गळाभेट घेत दिल्या पोज, चाहते म्हणाले…

अरिजित सिंहच्या काही चाहत्यांनी ट्विटरवर या कॉन्सर्ट साईटचे व्हिडीओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. याठिकाणी इमारतींचं बांधकाम सुरू होतं, त्यामुळे चाहत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच या कॉन्सर्टसाठी तब्बल आठ हजार लोक पोहोचले होते. पण त्यांना आत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी फक्त एकच गेट होता. तुफान गर्दीमुळे इथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती. या गैरव्यवस्थापनाविरुद्ध चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. इतके पैसे देऊन तिकीट खरेदी केल्या आणि कोणत्याच प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, अनेकांना या प्रकरणानंतर दिवंगत गायक केकेच्या शेवटच्या कॉन्सर्टची आठवण झाली आहे. त्याठिकाणीही अशाच प्रकारे चाहत्यांना गर्दीत कॉन्सर्ट ऐकावा लागला होता. एसीची व्यवस्था नसल्याचीही तक्रार तेव्हा लोकांनी केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arijit singh concert ahmedabad fans face issues of exit gate slams management hrc