बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी यावर्षी मे महिन्यात दुसरं लग्न केलं. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्या लग्नाबद्दल माहिती दिली होती. त्यांचं पहिलं लग्न अभिनेत्री पिलू बरुआशी झालं होतं. या जोडप्याला २२ वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव अर्थ आहे. तर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव रुपाली बरुआ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“विश्वास बसत नाहीये”, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर क्रिती सेनॉनची प्रतिक्रिया; तर आलिया म्हणाली, “मला जमेल तोपर्यंत…”

पिलू व आशिष दोघांचा २०२२ मध्ये घटस्फोट झाला होता. पिलू यांनी ‘इ-टाइम्स’शी बोलताना आशिष यांच्यापासून वेगळं होण्याचं कारण सांगितलं. “आम्ही नेमके का वेगळे झालो, यामागचं कारण संपूर्ण शोधत आहे. पण खरंतर जे कारण आहे, त्यावर कुणालाही विश्वास बसत नाही. कारण ते त्यांच्या कथेशी जुळत नाही. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. आमचे कनेक्शन आहे. पण आमचे मार्ग एकमेकांशी जुळत नव्हते इतकंच. आत्तापर्यंत मी माझ्या स्वेच्छेने यावर बोलले नाही, पण एके दिवशी माझ्या लक्षात आलं की माझी चॉइस बदलली आहे. आम्ही दीड वर्ष त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला लक्षात आलं की भविष्यासाठी आमचे विचार आणि ध्येये एकमेकांपेक्षा वेगळे आहेत,” असं त्या म्हणाल्या.

“ते २० वर्षांपासून वेगळे राहायचे”, वडील रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरचा खुलासा; कारण सांगत म्हणाला, “त्यांच्याशी आमचं नातं…”

पिलू पुढे म्हणाल्या, “मी माझं काम करत आहे आणि आज मी खूप आनंदी आहे. मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. माझे माझ्या सासरच्या लोकांशी आणि संपूर्ण कुटुंबाशी खूप चांगले संबंध आहेत. ते सर्व लोक माझ्याशी खूप प्रेमाने बोलता. त्यांनाही माहीत आहे की आम्ही इतकी वर्षे, इतका वेळ खूप चांगला घालवला. मी एक स्वतंत्र, मुक्त विचारांची कलाकार आहे. मी एक चांगली मुलगी, सून, पत्नी आहे, मी खूप चांगली आई आहे, माझे माझ्या मुलाशी खूप चांगले संबंध आहेत. मी माझा मार्ग निवडला याचाही त्याला खूप आनंद आहे.”

“विचारण्याची पद्धत असते की नाही”? ‘गदर २’च्या निर्मात्यांवर संगीतकाराचा संताप; नेमकं काय घडलं?

“पतीला पत्नी म्हणून जी साथ हवी असते, ती मी त्यांना देऊ शकत नव्हते. पण मी कधीच त्यांचा तिरस्कार केला नाही. त्यांनी मला मारलं किंवा घरात डांबून ठेवलं नव्हतं. प्रत्येकजण वेगळा असतो, कोणीही चुकीचं नाही, कोणीही बरोबर नाही, परंतु मी आता स्वतःला कोणाची तरी बायको म्हणून पाहू शकत नाही. मी त्यांना माझे सत्य सांगितले आणि त्यांनी त्याचा आदर केला आणि स्वीकारला. इथे कोणाचीच चूक नाही. आशिष कधीही चित्रपट पाहत नाही, पण मी काम करतेय याचा त्यांना आनंद आहे. माझा मुलगाही खूप आनंदी आहे. आयुष्यात सगळं ठीक आहे,” असं पिलू म्हणाल्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish vidyarthi first wife piloo vidyarthi reveals reason of divorce says she couldnt see herself as someone wife hrc