Ayushmann Khurrana did in his 13 years career 19 films: लोकप्रिय अभिनेता आयुष्मान खुराना हा लवकरच एका नवीन चित्रपटातून आणि नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘थामा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानादेखील प्रमुख भूमिकेत आहे.
आयुष्यमान खुरानाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. तसेच, अभिनेत्याच्या भूमिकेचेही कौतुक झाले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता अभिनेत्याने १३ वर्षांच्या चित्रपटांच्या कारकिर्दीत एकूण १९ चित्रपटांत काम केले आहे.
या १९ चित्रपटांतील तीन चित्रपट सुपरहिट ठरले आहेत; तर चार चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पाच चित्रपट हिटही ठरले नाहीत आणि फ्लॉपदेखील झाले नाहीत. त्याशिवाय त्याचे सात चित्रपट फ्लॉप ठरले.
आयुष्मान खुरानाचे ३ सुपरहिट चित्रपट
आयुष्मान खुरानाचा ‘अंधाधुन’ हा पहिला सुपरहिट चित्रपट आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७४.५९ कोटींची कमाई केली होती.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बधाई दो’ हा चित्रपटदेखील मोठ्या प्रमाणात गाजला. या चित्रपटाने १३७.६१ कोटी रुपयांची कमाई केली. त्याबरोबरच २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीमगर्ल’ला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने १४२.२६ कोटींची कमाई केली.
आयुष्मान खुरानाचे हिट चित्रपट कोणते?
आयुष्मान खुरानाचा पहिला चित्रपट ‘विकी डोनर’ हिट झाला होता आणि या चित्रपटाने ३५.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाला’ने बॉक्स ऑफिसवर ११६.८१ कोटी रुपये कमावले.
‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०.७८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीमगर्ल २’ हा सिनेमादेखाल देखील हिट झाला होता. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १०४.९० कोटी रुपयांची कमाई केली.
सरासरी चित्रपट
‘दम लगा के हईशा’ व ‘आर्टिकल १५’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला; तर ‘नौटंकी साला’, ‘बरेली की बर्फी’ व ‘शुभ मंगल सावधान’ हे चित्रपट सरासरी ठरले.
आयुष्मान खुरानाचे फ्लॉप झालेले सिनेमे कोणते?
‘एन एक्शन हीरो’, ‘डॉक्टर जी’, ‘अनेक’, ‘चंडीगढ करे आशिकी’, ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘हवाईजादा’, ‘बेवकूफियां’ हे आयुष्मान खुरानाचे सात चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
आता अभिनेत्याचा ‘थामा’ चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.