Manish Chaudhari Shruti Mishra love story : बॉलीवूडमध्ये तुम्ही कलाकारांच्या फिल्मी लव्ह स्टोरी ऐकल्या असतील. आज ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधील एका अभिनेत्याची व त्याच्या १७ वर्षांनी लहान पत्नीची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात. थिएटरमध्ये पहिली भेट, जवळीक आणि दोन वर्षे कुटुंबियांची मनधरणी केल्यानंतर लग्न असा त्यांच्या नात्याचा प्रवास राहिला. मनीष चौधरी असं या बॉलीवूड अभिनेत्याचं नाव आहे. त्याच्या पत्नीचं नाव श्रुती मिश्रा आहे.
आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये मनीष चौधरीने फ्रेडी सोडावाला ही भूमिका केली आहे. मनीषच्या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. मनीष चौधरीचं काम चर्चेत असलं तरी त्याची लव्ह स्टोरीही खूपच फिल्मी आहे. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत मनीषने सांगितलं की त्याची पत्नी त्याच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान आहे. वयात इतकं अंतर असूनही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मनीष व श्रुतीची पहिली भेट
मनीष चौधरीबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल पत्नी श्रुती मिश्रा म्हणाली, “मुंबईतील एका थिएटरमध्ये मनीषला भेटून असं वाटलं की मला माझ्यासारख्याच विचारांचं कोणीतरी भेटलंय.” मनीष हसत म्हणाला, “मी तिला लवकर ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं, पण श्रुतीने थोडा जास्त वेळ घेतला.”
मनीषने त्याचं वय सांगितलं, त्यावर विश्वास बसला नाही, कारण दोघांच्या वयात खूप अंतर होतं असं श्रुती सांगते. “आमच्या वयात १७ वर्षांचे अंतर आहे. मला आठवतंय मी मनीषला विचारलेलं, तुझं वय किती आहे? त्याने वय सांगितल्यावर मला विश्वास बसला नाही. खरंच का? असं मी विचारलं होतं. मला आमच्या वयात अंतर आहे हे माहित होतं पण इतकी वर्षे असं वाटलं नव्हतं,” असं श्रुतीने नमूद केलं.
मनीषशिवाय एक दिवसही राहू शकत नाही श्रुती
वयात अंतर असलं तरी नातं टिकेल, असा विश्वास श्रुतीला होता. “वयात कितीही अंतर असलं तरी आम्हाला कायम सोबत राहायचं आहे. तुला माझ्यापेक्षा जास्त जगावं लागेल, कारण मी तुझ्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही,” असं श्रुती मनीषला म्हणाली होती.
श्रुतीच्या कुटुंबियांचा विरोध
दोघांच्या वयात अंतर असल्याने श्रुतीच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. तिला कुटुंबियांची मनधरणी करायला दोन वर्षे लागली. “मला कुटुंबियांना या लग्नासाठी तयार करायला दोन वर्षे लागली. लग्न करेन तर याच्याशीच, नाहीतर कधीच लग्न करणार नाही, असं मी घरच्यांना सांगितलं. सर्वांची मनधरणी करायला मला दोन वर्षे लागली,” असं श्रुती म्हणाली.
मनीषने श्रुतीला केलेलं प्रपोज
“करोना काळात आम्ही सोफ्यावर बसलो होतो. मनीषने विचारलं, माझ्याशी लग्न करशील का? मी विचारलं, हे प्रपोजल आहे का? मनीषने हो म्हटलं आणि मी म्हणाले, ठीक आहे,” असं श्रुती हसत म्हणाली.
दरम्यान, मनीष चौधरीने २०१६ मध्ये साखरपुडा केला होता. पण लग्न व्हायच्या आधीच साखरपुडा मोडला. त्यानंतर २०२३ मध्ये मनीषने ५४ व्या वर्षी श्रुती मिश्राशी लग्न केलं.