नुकताच ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे पाहायला मिळाले. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर केले. त्यामध्ये अनेक कलाकारांच्या लहान मुलांच्या फोटो, व्हिडीओंचाही समावेश आहे. या व्हिडीओवर चाहते पसंती दर्शवीत आहेत. वरुण धवनने पहिल्यांदाच त्याच्या लेकीचा चेहरा दाखवला. तर, दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका ख्रिसमस ट्रीचा फोटो शेअर केला. त्यावर तीन फुगे लावल्याचे दिसले. या फुग्यांवर रणवीर, दीपिका व दुआ, अशी नावे लिहिण्यात आली होती. आता अभिनेत्री बिपासा बासू(Bipasha Basu )च्या मुलीचा एक व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ

अभिनेत्री बिपाशा बासूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ख्रिसमस सण साजरा केल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिची मुलगी देवी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने सुंदर लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने फोटोंसाठी पोजदेखील दिल्याचे पाहायला मिळत आहे. एका व्हिडीओमध्ये ती आनंदाने डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिचे कुटुंबीय तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. याबरोबरच एका व्हिडीओमध्ये सजवलेले ख्रिसमस ट्री दिसत असून, त्यावर देवी असे नाव लिहिलेले देवीचे सुंदर फोटो लावल्याचे पाहायला मिळत आहे. तर, काही फोटोंमध्ये देवी तिचे आई-वडील बिपाशा बासू व करण सिंग ग्रोवर यांच्याबरोबर दिसत आहे.

बिपाशाने देवीबरोबर शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रेम व्यक्त केले आहे. अनेकांनी ती बाहुली असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी ‘सुंदर’ असे लिहीत प्रेम व्यक्त केले आहे. काहींनी ‘क्यूट’ लिहित देवीचे कौतुक केले आहे.

अभिनेत्री बिपाशा बासू अनेकदा देवीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. देवी तिच्या क्यूट अंदाजाने चाहत्यांची मने जिंकताना दिसते. नेटकरी कमेंट्स करीत देवीचे कौतुक करतात.

हेही वाचा: Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

दरम्यान, रणबीर कपूर व आलिया भट्टची लेक राहा हिनेही सर्वांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले. राहाने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. राहा अनेकदा सर्वांचे मन जिंकून घेताना दिसते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bipasha basu shares daughter devis dance video won the hearts of fans netizen praised nsp