‘यारियां’ फेम बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहली लग्नबंधनात अडकणार आहे. तो ३५ वर्षांचा आहे. हिमांश अरेंज मॅरेज करणार आहे. तो नवी दिल्लीत लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिमांश १२ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये एका खासगी समारंभात लग्नबंधनात अडकणार आहे. त्याचं लग्न एका मंदिरात होणार आहे. हिमांशचे कुटुंबीय सध्या त्याच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हिमांशची होणारी पत्नी सिनेसृष्टीतील नाही.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या २२ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आई-वडिलांबरोबर केला गृहप्रवेश; फोटोंमध्ये दाखवली घराची झलक

हिमांशच्या लग्नाचे कपडे डिझायनर कुणाल रावल डिझाईन करणार आहे. हिमांशच्या लग्नाचा सोहळा खूपच खासगी असेल. या लग्नात फक्त त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – प्रियांका चोप्राच्या लेकीचं हिंदी ऐकलंत का? गोंडस मालतीने बाबाजवळ उच्चारला ‘तो’ शब्द, व्हिडीओ व्हायरल

हिमांशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तो चार वर्षे गायिका नेहा कक्करबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. त्यांनी २०१४ ते २०१८ या काळात एकमेकांना डेट केलं. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर नेहाने रोहनप्रीतशी लग्न केलं, तर हिमांश मात्र सिनेसृष्टीपासून दुरावला. आता लवकरच तो एका सिनेमात दिसणार आहे.

हेही वाचा – Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…

‘यारियां’ फेम हिमांश ‘स्विटी वेड्स एनआरआय’, ‘हमसे है लाईफ’, ‘रांची डायरीज’, ‘दिल जो ना कह सका’ यामध्ये झळकला. ‘यारियां’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या हिमांशचं फिल्मी करिअर फारसं यशस्वी राहिलं नाही. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो ‘बुंदी रायता’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रवी किशन, राजेश शर्मा, सोनाली सहगल आणि शिल्पा शिंदे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor himansh kohli arrange marriage in delhi temple hrc